Home मुंबई राजकीय धुळवडीत माजी खासदार उन्मेष पाटील एकनाथ शिंदे शिवसेनेत !

राजकीय धुळवडीत माजी खासदार उन्मेष पाटील एकनाथ शिंदे शिवसेनेत !

62
0

पक्ष प्रवेशासाठी करणार मोठे शक्तीप्रदर्शन!

शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. अनेक आमदार, विविध जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांनी तीन वर्षांपुर्वी शिंदे सेनेत प्रवेश केला. तर आता कोणत्याही निवडणुका नसतानाही इतर काही कारणांमुळे काही नेते शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याचे दिसते.
माजी खासदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. येत्या ६ मार्च रोजी ते शक्ती प्रदर्शन करत मुंबईत शिंदे सेनेत दाखल होतील. या प्रवेश सोहळ्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

*जप्तीची कारवाई आणि पक्ष सोहळा*

छत्रपती संभाजीनगरच्या बँकेकडून उन्मेष पाटील यांच्या मालमत्तेची जप्तीची कारवाई सुरू होताच त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पाटील यांनी 2024 च्या लोकसभेला भाजपकडून तिकीट नाकारल्यामुळे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 2024 ला चाळीसगाव विधानसभा देखील लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. आता त्यांच्या या पक्ष सोहळ्याने चाळीसगावसह जळगावच्या राजकारणात शिंदे सेनेत गट तट तयार होतील की शिवसेना अधिक मजबूत होईल ही चर्चा होत आहे.

तीन दिवसांनी प्रवेश सोहळा

उन्मेष पाटील यांनी अखेर ठाकरे गटाला रामराम ठोकला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ६ मार्च रोजी मुंबई येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत प्रवेश होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केल्यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेत बदल झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा पक्ष प्रवेश दबावा खाली तर होत नाही ना? अशी चर्चाही होत आहे.

गेल्या महिन्यात त्यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेत प्राथमिक चर्चा केली होती. २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आलेल्या पाटील यांना २०२४ मध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांची सक्रियता कमी झाली होती. आता त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचा फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रतिक्रियेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. तर मित्र पक्ष भाजप आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची काय प्रतिक्रिया असेल याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here