Home Uncategorized ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्ये … गोविंदगिरी महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य!

ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्ये … गोविंदगिरी महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य!

42
0

“आपल्या संत परंपरेमध्ये दासबोधच केवळ ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्ये आहेत.” त्याचबरोबर “नामदेव महाराजांनी तुकाराम महाराज यांची गाथा हे संकलन आहे.” असे वादग्रस्त वक्तव्य गोविंदगिरी महाराज यांनी पुणे विद्यापीठातल्या “ज्ञानोबा ते तुकोबा” या तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात केले. “स्वतंत्र ग्रंथ कसा लिहावा याचे आदर्श रामदास स्वामी आहेत.” असे ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावरून वादंग उठला असताना देहू संस्थानाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

गोविंदगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानाचे विश्वस्त तसेच तुकाराम महाराजांचे वंशज दिलीप महाराज मोरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “गोविंदगिरी महाराजांनी मांडलेले मत हे त्यांचे वैयक्तिक वक्तव्य आहे. त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्रातील कोणताही शहाणा माणूस या वक्तव्याशी सहमत होणार नाही.”असे दिलीप महाराज मोरे म्हणाले.

*देहू संस्थानाने खडसावले!*
वैभव महाराज मोरे यांनी म्हटले की, “महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्र संतांच्या विचारावर चाललेला आहे. तुकारामांचे अभंग हे पंचम वेद म्हणून अभ्यासले जातात. महाराजांच्या प्रत्येक अभंगावर मोठा अभ्यास झाला आहे. अणु व रेणू यावर महाराजांनी अभंग रचले आहेत. महाराजांची गाथा जो वाचेल त्याच्या जीवनात अमुलाग्र बदल होतील. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत महाराजांचे अभंग हे अभंगच राहतील.” अशा शब्दात ज्ञानोबा तुकाबांचं महत्त्व देहू संस्थानाने गोविंद गिरी महाराज यांना सांगितले.

ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेला अप्रत्यक्षपणे कमी लेखण्याचा प्रयत्न
संतपरंपरेत दासबोधच केवळ ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्ये आहेत. त्याचबरोबर नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या गाथा या संकलन आहेत, असे वादग्रस्त विधान करून अप्रत्यक्षपणे स्वामी गोविंदगिरी महाराजांनी ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेला अप्रत्यक्षपणे कमी लेखण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here