इयत्ता आठवीच्या NCERT च्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याने नागपूरच्या राजघराण्याचे मुधोजी राजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवण्यात आले असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
तसेच शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि NCERT कडे नकाशा तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे. राजस्थानसह मराठा साम्राज्याच्या विस्ताराचे ऐतिहासिक पुरावे असताना नकाशा हटवणे म्हणजे इतिहास वाकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने राज्य सरकारने ठोस भूमिका घेऊन केंद्राकडे आक्रमक पाठपुरावा करावा, अशी मागणी आता मुधोजी राजे भोसले यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला आमचा पुर्णपणे समर्थन असून मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास बदलण्याचा कोणाला काही एक अधिकार नाही असे
अजित चव्हाण, सह-मुख्य प्रवक्ता, भाजपा महाराष्ट्र
यांनी म्हटले आहे.
Home उद्योग / शिक्षण वार्ता मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास बदलण्याचा कोणाला अधिकार नाही – अजित चव्हाण, सह-मुख्य प्रवक्ता,...
















