Home मुंबई *प्रशासनात भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही! – अन्न व औषध प्रशासन मंत्री...

*प्रशासनात भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही! – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ*

57
0

मुंबई
अन्न व औषध प्रशासन विभागातील लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कठोर पावले उचलली आहेत. लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या लिपिकाविरोधात केवळ चौकशीच नव्हे, तर त्याची प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

“प्रशासनात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत मंत्र्यांनी विभागातील दक्षता पथकाला या प्रकरणाची सखोल आणि गोपनीय चौकशी करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. संबंधित लिपिक राजेंद्र ढेरंगे याच्याविरुद्ध वस्तुनिष्ठ आणि सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.

राजेंद्र ढेरंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होता. त्याची प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करून त्याला मूळ विभागात परत पाठविण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

या संपुर्ण प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी सहआयुक्त (दक्षता) आणि संबंधित पोलीस उपायुक्त यांना पाचारण करण्यात आले असून, लवकरात लवकर सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता, जबाबदारी आणि शिस्त प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने मंत्री नरहरी झिरवाळ यांनी उचललेले हे पाऊल महत्त्वपुर्ण मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here