*चांगल्या कलाकृतींना प्रोत्साहन देणेही आवश्यक !*
*एक गंभीर प्रश्न आहे नेहमीचाच, कलेसाठी कला की जीवनासाठी कला? असं विचारलं तर यावर प्रत्येक व्यक्ती आपल्या आकलन, कृती आणि जगण्याच्या पध्दतीनुसार व्यक्त होईल.*
*आपल्या देशाच्या घटनेने अनेक स्वातंत्र्य जनतेला दिलीत!*
*संचार स्वातंत्र्य हे तर नेहमीच वादात असते. कारण देशाचे नागरिक म्हणून देशात आम्ही कुठेही जाऊ शकतो, जगण्यासाठी काम करु शकतो, असं म्हणताना आपले राज्य सोडून महाराष्ट्रात येताना सोबत आपला माज आणि जगण्याची स्टाईल, असे सगळे विषय सोबत आणले तर महाराष्ट्राच्या मातीत अनेक प्रश्न निर्माण होतातच आणि झालेत.*
*अशा परिस्थितीचा फायदा राजकीय समीकरण जुळवताना जास्त घेतला जातो.*
*तसाच प्रकार समाजावर प्रभाव टाकणारी माध्यमे म्हणजे नाटक,सिनेमा, मालिका आणि आताच्या ओटीटीवरील मालिका नि चित्रपटांबाबत म्हणता येईल.*
वर्तमान पत्रे आणि चॅनल्स यांच्यावर असलेली कायदेशीर बंधने नियमावली इथे *ओटीटीवर आहेत का? आणि असली तर ते यावरील मंडळी मानतात का हा प्रश्न उभा होतोच!*
*जरी कलाकृतीच्या सुरुवातीलाच निर्माते ,दिग्दर्शक ही कलाकृती काल्पनिक आहे. याचा कुणाशीही संबंध नाही असं जाहीर करतात. पण जनता हुषार असते ती यातून हवा तो अर्थ काढते. ..काही जणं यातला अंडर करंट न समजणारे असतात, त्यांच्यावर या अशी कलाकृतीचा थेट परिणाम होतोच.*
*नीरज पांडे यांचा ‘घुसखोर पंडत’ हा नेटफ्लिक्स ओटीटीवरचा चित्रपट आणि झी 5 या ओटीटीवरील*
*’देवखेळ’ मालिका! यावर*
*वाद रंगलाय,विरोध वाढलाय,संताप वाढलाय!*
*नीरज पांडे यांनी ‘घुसखोर पंडत’ या वादग्रस्त ओटीटी मालिकेच्या शीर्षकावरून वाढत्या वादावर एक लांबलचक पोस्ट प्रसारित केलीय, ते म्हणतात, “आमचा चित्रपट एक काल्पनिक पोलीस ड्रामा आहे.* *काल्पनिक नावात ‘पंडत’ हा शब्द वापरला आहे, जो बोलीभाषेत खूप सामान्य आहे. ही कथा व्यक्तींच्या कृती आणि निवडींवर आधारित आहे, त्यात जात, धर्म किंवा समुदायाचे कोणतेही प्रतिनिधित्व नाही.”*
*नीरज पांडे यांनी पुढे लिहिले की, “आम्हाला समजते की शीर्षक काहींना नाराज करू शकते. आम्ही सध्यासाठी सर्व प्रमोशनल मटेरियल काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, कारण आम्हाला वाटते की, चित्रपट पुर्णपणे पाहणे आणि आमच्या कथेच्या संदर्भात समजून घेणे महत्त्वाचे आहे, अपुर्ण दृश्यांवर आधारित त्याचा न्याय करण्यापेक्षा.”*
*हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाराय आणि त्यात मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता, तो आता काढून टाकण्यात आले आहे.*
*चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.*
*उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘घुसखोर पंडित’ वेब सीरीजच्या निर्मात्यांविरुद्ध एफआयआर दर्ज करण्याचा आदेश दिला. त्यांनी सांगितले की, “या सीरीजमुळे ब्राह्मण समुदायाची मानहानि होत आहे आणि सामाजिक सद्भाव बिघडत आहे.”*
*सर्व ब्राह्मण महासभा या संघटनेने ‘घुसखोर पंडत’ वेब सीरीजच्या शीर्षकाचा विरोध केला आहे. त्यांनी सांगितले की, या सीरीजमुळे ब्राह्मण समुदायाची बदनामी होत आहे.*
*काँग्रेस उत्तर प्रदेश अध्यक्ष अजय राय यांनी सांगितले की, हा विवाद भाजपची साजिश आहे. त्यांनी सांगितले की, भाजप हिंदू-मुसलमान करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.*
दोन दिवसाच्या विवादानंतर अभिनेते मनोज वाजपेयी यांनी आपलं म्हणणे मांडलं की,” *त्यांना लोकांच्या भावना आणि चिंतांचा आदर आहे. जेव्हा त्यांच्या कामामुळे काही लोकांना दुखापत होते, तेव्हा ते थरारतात आणि ऐकतात. एक कलाकार म्हणून कथेच्या माध्यमातून आणि त्यांच्या पात्राच्या माध्यमातून फिल्ममध्ये आलेत. फिल्ममध्ये त्यांनी एक दोषपूर्ण व्यक्तीची भूमिका केली आहे आणि त्याच्या* *आत्म-ज्ञानाच्या यात्रेचे चित्रण केले आहे.ही फिल्म कोणत्याही समुदायाविरुद्ध नाही. नीरज पांडे यांच्या साथीने काम करताना त्यांना त्यांच्या फिल्ममेकिंगच्या दृष्टिकोनात गंभीरता आणि सावधानी दिसली आहे. फिल्ममेकर्सनी सार्वजनिक भावनांचा आदर करत प्रमोशनल मटेरियल काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, हे चिंतांचा आदर दर्शवते.*
*तर दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रात झी ५ ची ‘देवखेळ’ वेबसीरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली. गुहागर परिसरातील नागरिकांनी वेबसीरीजचा टीझर आणि ट्रेलर सोशल *मीडियावरून डिलिट करण्याची मागणी केली, कारण टीझर आणि ट्रेलरमध्ये शंकासुर देवाबाबत अपमानास्पद मजकूर असल्याचा आरोप आहे.*
*शंकासुर देव हे गुहागर परिसरातील प्राचीन श्रद्धास्थान असून, शिमगोत्सव काळात हजारो भाविक श्रद्धेने उपासना करतात. वेबसीरीजच्या टीझरमध्ये शंकासुर देवाला क्रूर, अमानवी आणि अंधश्रद्धेशी जोडलेला देव म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे आरोप आहेत.*
*या प्रकरणामुळे समाजात असंतोष निर्माण झाला असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘आपलं गुहागर’ या सामाजिक संस्थेच्या वतीने गुहागर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहित आणि माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.*
*अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी भूमिका साकारलेल्या देवखेळ मधे कोकणातील शिमगोत्सवातील पारंपरिक व पौराणिक लोकनृत्य पात्र संकासुराला क्रूर, अंधश्रद्धा पसरवणारा म्हणून दाखवल्याच्या आरोपावरून झी ५ या मराठी ओटीटीवर प्रसारित होत असलेल्या ‘देवखेळ’ या वेबसीरिजवर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.* *यासंदर्भात त्यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना निवेदन दिलं आहे.*
*संकासूर हे कोकणातील शिमगा उत्सवातील एक भक्तिमय,*पौराणिक व पारंपरिक पात्र आहे. त्याला शिवाचा अवतार मानलं जातं. काळ्या रंगाचा पोशाख, मुखवटा व हातात वेत घेऊन गोमूसोबत गावागावांत फिरणारा संकासूर गावकऱ्यांना आशीर्वाद देतो. ही केवळ करमणूक नसून कोकणची शेकडो वर्षांची श्रद्धा व सांस्कृतिक परंपरा आहे.देवखेळ’ या वेबसीरिजमध्ये संकासुराला खुनी व क्रूर प्रवृत्तीचे पात्र दाखवलं आहे.*
*या मालिकेचे चित्रिकरण गुहागर तालुक्यात झालं असून संकासुरावर डॉक्युमेंटरी करत असल्याचे सांगून प्रत्यक्षात वेबसीरिजचे शूटिंग केल्याचा आरोपही केला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण कोकणात संतापाचे वातावरण आहे. नमन मंडळे, भजन मंडळांतील कलाकार तसेच *सर्वसामान्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत गुहागर पोलिस ठाणे ते जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असेही आमदार जाधव यांनी नमूद केले आहे.*
*दरम्यान शनिवारी ना.आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदनाद्वारे , या वेबसिरीजवर बंदी घालण्यासाठीची मागणी केली आहे.*
*ना डाॅ उदय सामंत यांनी यातील चुकीच्या गोष्टींना विरोध दर्शवला , जे चुकीचे व देवतांना दुखवणारे आहे त्यावर योग्य ती कृती होईल.अशा भावना व्यक्त केल्यात.*
*सर्व ब्राह्मण महासभा या संघटनेने ‘घुसखोर पंडत’ वेब सीरीजच्या शीर्षकाचा विरोध केला त्यांनी सांगितले की, या सीरीजमुळे ब्राह्मण समुदायाचीबदनामी होत आहे.* म्हटलं
तर
*काँग्रेस उत्तर प्रदेश अध्यक्ष अजय राय यांनी सांगितले की,हा विवाद भाजपची साजिश आहे. त्यांनी सांगितले की, भाजप हिंदू-मुसलमान करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.*
*पंडत ही एक व्यक्तीरेखा आहे, त्या एका व्यक्तीचा तो सिनेमा! तो सार्वत्रिक ,प्रातिनिधिक नाही. पुर्वीही अशी जाती व कामावरून शीर्षकाचे चित्रपट आले होते.*
● *पण विषय असा की , जात वगैरे बाजूला ठेवून तो सिनेमा पाहून मग विरोध होणे अपेक्षित होते.*
पण आधीच गदारोळ व विरोध सुरु झाला.*
*तर देवखेळ च्या ट्रिजर मधील वादग्रस्त वाक्यामुळे वाद पेटला.*
*हे सिनेमा मालिका वाले, मूळ कलाकृतींपेक्षा तिची प्रसिद्धी करणारे जाहिरातीचे विडियो बनवून प्रेक्षकांना आकर्षित करतात.*
*इथेच चूक होते.मुळात पैसे टाकणारा निर्माता, दिग्दर्शक इथे खुपच जास्त स्वातंत्र्य घेतो. ओटीटीवर काहिही करू चालतय, म्हणतं पार घसरतात. असाच प्रकार या देवखेळ व घुसखोर पंडत बाबत झाला नी लोकांचा संताप वाढला.*
● *अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीचे एक महत्त्वाचे अंग आहे, पण त्याच वेळी इतरांच्या भावना आणि अधिकारांचा आदर करणे देखील महत्त्वाचे आहे.*
*अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपले विचार आणि भावना मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार. पण हे स्वातंत्र्य असीम नाही, त्याला काही मर्यादा आहेत.*
*इतरांच्या भावना आणि अधिकारांचा आदर करणे,* *सामाजिक सद्भाव राखणे आणि देशाच्या एकतेला धक्का न देणे हे देखील महत्त्वाचे आहे.*
*विरोध आणि अभिव्यक्ती:*
*विरोध हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा भाग आहे.*
*पण विरोध करताना इतरांच्या भावना आणि अधिकारांचा आदर करणे महत्त्वाचे आहे.*
*हिंसाचार आणि धमकावणे हे कधीही स्वीकारार्ह नाही.*
*अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक संवेदनशीलता यांचा समतोल साधणे महत्त्वाचे आहे.*
*कलाकार, निर्माते आणि लेखकांनी त्यांच्या कामात सावधानी बाळगणे महत्त्वाचे आहे.*
*समाजाने देखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणे आणि इतरांच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे आहे.*
*आपण हे कितीही म्हणू पण मनोरंजनाच्या बाजारात आमची कलाकृती काल्पनिक आहे म्हटलं तरी ती कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा थोडा का होईना आधार घेत असते.*
*नेटफ्लिक्स व झी ५ ओटीटींनी या नावांना मंजुरी कशी दिली?* *यातली कथा,संवाद याची पडताळणी केली का नाही?* *असे प्रश्न उभे रहातात.*
*कुणाच्याही आदर, देव आणि सन्मान्य भावनांना धक्का लागताच कामा नये.*
*सरकारने ओटीटीवर तत्काळ कठोर निर्बंध लावून नियमावली तयार करणे आवश्यक आहे.*
*नाहीतर असे प्रकार नेहमीच घडत रहातील.*
***




















