Home मुंबई *मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यास काँग्रेस नगरसेवकांचे प्राधान्य, बीएमसीतील बँक ठेवीची श्वेतपत्रिका काढा- अश्रफ...

*मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यास काँग्रेस नगरसेवकांचे प्राधान्य, बीएमसीतील बँक ठेवीची श्वेतपत्रिका काढा- अश्रफ आजमी.*

50
0

*महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयाची काँग्रेसकडून पाहणी व ताबा.*

मुंबई

मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते अश्रफ आझमी यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयाची पाहणी करून कार्यालयाचा ताबा घेतला.
या कार्यालयात वास्तूदोष असल्याचे सांगत शिंदेसेनेने ते नाकारले होते, वास्तूदोष हा ज्याचा त्याचा भावनेचा प्रश्न आहे, काँग्रेस पक्षासाठी मात्र सर्वसामान्य मुंबईकरांचे हित महत्त्वाचे आहे. कार्यालयाची दिशा महत्वाची नाही तर विकासाची दिशा असली पाहिजे.

“महानगरपालिकेत मागील चार वर्षापासून प्रशासक राज सुरु होते. या काळात भाजपा महायुतीने मुंबईकरांच्या पैशावर दरोडा टाकला आहे. विकास कामाच्या नावाखाली खिसे भरण्याचे काम केले आणि मुंबईकरांना मात्र वाऱ्यावर सोडले. महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्याबरोबरच शिक्षण, आरोग्य, बेस्ट सेवा, पिण्याचे पाणी, प्रदुषण या महत्वाच्या प्रश्नावर महापालिकेत काँग्रेसचे नगरसेवक आवाज उठवतील व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करतील. प्रशासकराज मध्ये महापालिकेतील ९० हजार कोटींच्या ठेवीवरही डल्ला मारला आहे, यासंदर्भातील श्वेतपत्रिका काढा.” अशी मागणी यावेळी काँग्रेसचे महानगरपालिकेतील गटनेते अश्रफ आझमी यांनी केली.
यावेळी काँग्रेस गटनेते अश्रफ आझमी, नगरसेवक न्यानराज निकम, रुकसाना पारेख, मेहर मोहसीन हैदर, मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस, माजी नगरसेवक बब्बू खान, जावेद जुनेजा, मोहसीन हैदर इत्यादी नेते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here