*देशातंगर्त उत्पादन वाढवण्यावर आमचा भर – निर्मला सितारमण*
आत्मनिर्भर भारत हे सरकारचे सर्वात प्रमुख लक्ष्य
लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू – निर्मला सितारमण
*सामान्यांची निराशाच! अर्थसंकल्पातून कुणाच्या वाट्याला काय?*
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण रविवार,१ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचा नववा अर्थसंकल्प केला. त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण ११ वाजता सुरू झाले. रविवारी अर्थसंकल्प मांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून अनेक क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा होत्या. त्यापैकी ५ प्रमुख क्षेत्रे, जिथे सकारात्मक घोषणांची जनता आशा करत होती. या अर्थसंकल्पात काय स्वस्त होणार आणि काय महाग हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरमहा अंदाजे ₹१०००००पर्यंत उत्पन्न असलेल्यांना कर स्लॅबमधून सूट देण्यात आली, ज्यामुळे मध्यमवर्गाला थेट फायदा झाला. यावेळी, पगारदार वर्ग कर स्लॅबमध्ये काही नवीन बदल किंवा अतिरिक्त सवलत दिली जाते का हे पाहण्याची उत्सुकता होतीच.
मंत्री निर्मला सीतारमण यांनी १ तास २७ मिनिटे अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी काय काय घोषणा केल्या आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज, १ फेब्रुवारी २०२६रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. हे त्यांचे नववे अर्थसंकल्प आहे. काही महत्त्वाच्या घोषणांमध्ये विवाहित जोडप्यांसाठी वैकल्पिक संयुक्त कर आकारणी, आयुर्वेद आणि योगासाठी तीन नवीन अखिल भारतीय संस्थांची स्थापना, आणि सेमीकंडक्टर उद्योगासाठी ४० हजार कोटी रुपयांची तरतूद यांचा समावेश आहे.
अर्थसंकल्पातील मुख्य
*विवाहित जोडप्यांसाठी संयुक्त कर आकारणी:* वैकल्पिक संयुक्त कर आकारणीचा प्रस्ताव
*आयुर्वेद आणि योग:* तीन नवीन अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थांची घोषणा
*सेमीकंडक्टर उद्योग:* ४० हजार कोटी रुपयांची तरतूद
*महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना:*वस्रोद्योग, हातमाग, हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी
रेल्वे:मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर आणि पुणे-हैदराबाद, दिल्ली-वाराणसी रेल कॉरिडॉरची घोषणा
अर्थसंकल्पात युवकांना केंद्रस्थानी ठेवून रोजगाराच्या नवीन संधी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पात तीन कर्तव्यांवर भर –
१-आर्थिक विकासाला वेग देणे आणि स्थायी आर्थिक विकास करणे
२ -नागरिकांच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करणे
३- सबका साथ सबका विकास या धोरणाला अनुकूल निर्णय घेणार
आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही
पादत्राणे, बॅटरी, मायक्रोओव्हन, टीव्ही स्वस्त
वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या वस्तूंवर आयातशुल्कात घट
ऑप्शन ट्रेडिंगवरील करात वाढ, फ्युचर्सवरील एसटीटी वाढवून ०.०५%, भांडवली बाजारातील शेअर्समध्ये मोठी घसरण
मद्यप्रेमींना मोठा झटका, किंमती वाढणार
भारतात डेटा सेंटर सुरू करणाऱ्यांना मोठी सूट दिली जाणार
अघोषित संपत्तीची मर्यादा आता १ कोटीपर्यंत करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले
छोट्या करचोरी प्रकरणात आता कोणतीही शिक्षा होणार नसल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले
आता ३१ ऑगस्टपर्यंत इंकम टॅक्स रिटर्न ITR भरता येणार
अपघाती विम्यावर मिळणारी रक्कम करमुक्त
१ एप्रिल २०२६ पासून नवा सुलभ प्राप्तिकर कायदा लागू
चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट ४.४%
काजूचे उत्पादन वाढवण्यावर भर देणार, भारतीय चंदनाची परिसंस्था टिकविण्यासाठी योजना
* दिव्यांग सहारा योजनेची घोषणा*
पशुपालन उद्योगासाठी अनुदान देणार
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यावर अधिक भर दिला जाणार
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटलिटीची घोषणा, २० महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळी १० हजार गाईडना प्रशिक्षण
पुर्व भारतात नवे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन सुरू करणार
प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल उभारले जाणार
Animation, Gaming उद्योगाला बळ देण्यासाठी १५ हजार शाळांमध्ये कंटेट क्रिएटर लॅब उभारणार
३नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा तयार करणार, गुजरातच्या जामनगरमध्ये वैश्विक आयुर्वेद चिकित्सा केंद्र
इलेक्ट्रॉनिक पार्टच्या निर्मितीसाठी ४० हजार कोटी
कंटेनर उत्पादनाच्या योजनेसाठी पाच वर्षांच्या कालावधीत १०,००० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद
पर्यटन वाढीसाठी सी प्लेन सुरू करण्याबाबत मोठी घोषणा
२०४७ पर्यंत कोस्टल शिपिंगमध्ये भारताचा हिस्सा दुप्पट केला जाणार
टीयर २, टीयर ३ शहरे, तीर्थस्थळे यांच्यासाठी पाच हजार कोटींची घोषणा
बायो फार्मा क्षेत्रासाठी तब्बल १०,००० कोटी रुपयांची तरतूद
मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर तसेच पुणे-हैदराबाद, दिल्ली-वाराणसी रेल कॉरिडॉर
कापूस उत्पादनासाठी नवीन योजना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता
लघु व सूक्ष्म उद्योगांसाठी १०००० कोटींचा एसएमई ग्रोथ फंड
वस्रोद्योग, हातमाग, हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना सुरू करणार
दुर्मीळ खनिजांचा साठा, विकास आणि प्रभावी वापर यासाठी विशेष औद्योगिक पट्टा तयार करणार
सेमीकंडक्टर उद्योगासाठी ४० हजार कोटी रुपयांची तरतूद
भारतात औषधं निर्मिती केंद्रांची निर्मिती. क्लिनिकल रिसर्च, संशोधनाला बळ
कर्करोग, मधुमेहावरील औषधांच्या किमती कमी
कृषी मंत्रालयाने आता या खास युरियाची विक्री किंमत निश्चित केली असून, यामुळे खतांच्या काळाबाजाराला चाप बसणार आहे.
पदवीसोबतच आता ‘यूट्यूबर’ होण्याचे स्वप्न पूर्ण होणार,५०० महाविद्यालयांमध्ये सुरू होणार हाय-टेक लॅब्स
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ‘एआय’ हे केवळ तंत्रज्ञान नसून ते प्रशासकीय कामात ‘मल्टिप्लायर’ (Multiplier) म्हणून काम करेल, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.




















