Home Uncategorized *महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये ५०% हून अधिक लोकांनी निवडणुकांनाच फेटाळले*

*महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये ५०% हून अधिक लोकांनी निवडणुकांनाच फेटाळले*

51
0

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये ५०% हून अधिक लोकांनी निवडणुकांनाच फेटाळलेले दिसते. याचा अर्थ सत्तेसाठी सट्टा लावणारे मतदारांना पसंत नाहीत त्याचप्रमाणे मतदारांना अशा निवडणूक पद्धतीवर व निवडणूक आयोगावर इतकेच कशाला तर एकूणच लोकप्रतिनिधीवरही विश्वास राहिलेला नाही.
एकूण मतदारांच्या संख्येचा विचार करता विजयी उमेदवाराला मतदारांच्या यादीनुसार ३५ टक्क्याहून अधिक मते असतील तरच तो पास असल्याचे धरावे अन्यथा तो एक प्रकारे नापासच म्हणावा लागेल. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतही पासिंग पस्तीस टक्के असते मग त्या तर्कानुसार 35% हून कमी मते मिळवणाऱ्या उमेदवाराला विजयी का मानावे?

बिनविरोध कसा?
_____________

तसेच निवडणुकांमध्ये उभे राहणाऱ्या उमेदवारांमध्ये चुरसच न राहता एकच उमेदवार उमेदवारी अर्ज भरतो आणि त्याला बिनविरोध निवडून आणले जाते हा तर्क काय कामाचा तो बिनविरोध असू शकत नाही. लढतीसाठी अन्य उमेदवार कोणीही नसल्यामुळे त्याला विजयी घोषित करण्यात येत आहे असे म्हणावे. विजयी उमेदवार अशा पद्धतीने जर घोषित केला गेलेला असेल तर त्याला एकही मत मतदारांनी दिलेले नाही हे लक्षात घेऊन विरोधी लढतीसाठी अन्य उमेदवार नसल्यामुळे नसल्यामुळे सदर उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येत आहे असे निवडणूक आयोगाने घोषित करायला हवे हा खरा योग्य तर्कवाद होऊ शकतो.
-रवींद्र यशवंत बिवलकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here