Home मुंबई *केंद्रीय मंत्री खा.पियुष गोयल यांच्या रविवारी मागाठाणेत दोन जाहीर सभा*

*केंद्रीय मंत्री खा.पियुष गोयल यांच्या रविवारी मागाठाणेत दोन जाहीर सभा*

64
0

मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वाणिज्य व उद्योग केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत मागाठाणे विधानसभा क्षेत्रात रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी दोन जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक ०३ येथे भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उच्चशिक्षित उमेदवार प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी ६ वाजता कानडे मैदान, केतकीपाडा, दहिसर (पूर्व) येथे तर प्रभाग क्रमांक २६ येथे महायुतीच्या प्रीतम पंडागळे या उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ इंद्रजी मार्केट, मेन रोड इंद्रजी डेरी समोर, दामूनगर, भीमनगर, अकुर्डी रोड कांदिवली (पुर्व) येथे सायंकाळी ७ वाजता खासदार पियुष गोयल यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार गोयल यांच्या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.” असे आवाहन भाजपा उत्तर मुंबई जिल्हा महामंत्री बाबा सिंग यांनी केले आहे.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here