Home Uncategorized उद्धव ठाकरेंनी ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार केला- अमित साटम यांचा आरोप!

उद्धव ठाकरेंनी ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार केला- अमित साटम यांचा आरोप!

67
0

महापालिका निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. राज्यात एकाच वेळी एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणूका होत आहेत. यात मुंबई महानगरपालिका सर्वच प्रकारे केंद्रस्थानी आहे.
मुंबईची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा, ठाकरे गट, शिंदे गटाने सर्व शक्ती लावली आहे. निवडणूक जवळ येत आहे तशी नेतेमंडळी आपल्या भाषणांतून विरोधकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री आ. उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांना लक्ष्य करुन साटम यांना चाटम म्हणाले होते.
आता भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी तब्बल ३ लाख कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप साटम यांनी केला आहे.

अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. ठाकरेंनी साटम यांचा उल्लेख चाटम असा केला होता. यावर बोलताना साटम म्हणाले की,” उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली. त्यांनी प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली आहे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे. मी सामान्य कुटूंबातून आलेलो आहे. कोणाच्या आशीर्वादाने आलो नाही.” असा टोला साटम यांनी लगावला.

ठाकरे यांनी तीन लाख कोटींच घोटाळा केला
तसेच पुढे बोलताना ठाकरेंनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप साटम यांनी केला. मुंबई शहरात रस्त्यात खड्डे आहेत की खड्डयात रस्ता अशी स्थिती आहे. गेल्या १० वर्षांत २१ हजार कोटी रुपये खर्च करून रस्त्याची अवस्था बिकट आहे. हे उद्धव ठाकरे यांच्यामुळेच झाले आहे. कोरोना काळात महालक्ष्मी येथील कोव्हिड सेंटर हे बिल्डरच्या भल्यासाठीच उभारण्यात आले होते. बॉडी बॅग, पीपीई कीट असं काहीही त्यांनी सोडलं नाही, असा आरोप साटम यांनी केला. तसेच मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी १७०० बार रेस्टॉरंटकडून वसुली केली. ते कोस्टल रोड आम्ही केला, असे म्हणत आहेत. परंतु त्यांच्या काळात हा रोड तयार करण्यासाठी तारखा ठरत नव्हत्या. कोस्टल रोडचं सगळं श्रेय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे.” असे स्पष्ट करुन साटम यांनी उद्धव ठाकरे यांनी ३ लाख कोटी रुपयांचा घोटाळा केला असा गंभीर आरोप केला.
आता अमित साटम यांच्या आरोपांना शिवसेना (उबाठा) कसे उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here