विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त ‘विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे’ या ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते, विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ निलम गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ग्रंथाचे संपादक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी, विलास मुकादम, किशोर आपटे यांना सन्मानित करण्यात आले. या ग्रंथासाठी महत्त्वपुर्ण भूमिका बजावणारे संपादक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार शीतल करदेकर, मुद्रितशोधक सत्यवान ताठरे, संजीव उपरे हेही यावेळी आवर्जून उपस्थित होते. नागपूर येथील विधानभवनाच्या विधानपरिषद सभागृहात झालेल्या या सोहळ्यात प्रास्ताविक ना. डॉ. नीलम गोऱ्हे, स्वागत प्रा. राम शिंदे, आभार एड. राहुल नार्वेकर यांनी मानले तर वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने यांनी सूत्रसंचालन केले. विधानमंडळ सचिव मेघना तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समारंभाची व्यवस्था चोखपणे पार पडली.

















