Home Uncategorized नांदेडकरांनी घराणेशाही नाकारली!

नांदेडकरांनी घराणेशाही नाकारली!

85
0

लोहा नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे गजानन सूर्यवंशीसह कुटुंबातील ६ जण पराभूत!

नगराध्यक्षपदासह सदस्य पदांसाठी एकाच कुटुंबातील ६ जणांचा पराभव झाला. लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपनं चक्क एकाच कुटुंबानं ६ जणांना उमेदवारी दिली होती. ज्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली होती. तर नगरसेवकपदासाठी गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे अशा ६ जणांना उमेदवारी दिली होती. पक्षात घराणेशाही चालत नाही म्हणाऱ्या भाजपने एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी दिल्याने चर्चेचा विषय बनला होता. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहा येथे जाहीर सभा घेतली होती. मात्र नांदेडकरांनी या घराणेशाहीला नाकारले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here