Home नाशिक *हँडबॉलच्या विकासासाठी नवे पर्व,*

*हँडबॉलच्या विकासासाठी नवे पर्व,*

88
0

*महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी मंत्री अतुल सावे यांची बिनविरोध निवड*

नाशिक
महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनच्या झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील हँडबॉल खेळाला सक्षम, दूरदृष्टीपूर्ण आणि प्रभावी नेतृत्व लाभले असून राज्यभर खेळाच्या विस्ताराला नवी दिशा मिळणार असल्याची भावना क्रीडाविश्वातून व्यक्त होत आहे.

 

ही निवडणूक हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली नाशिक येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे पार पडली. या निवडणुकीत निवृत्त न्यायमूर्ती मा. श्री. भगवंतराव गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. तर हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव डॉ. प्रीतपाल सिंग सलुजा हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.

 

 

नवीन निवडून आलेली कार्यकारिणी

अध्यक्ष : अतुल सावे

वरिष्ठ उपाध्यक्ष : विजय सोनवणे (जळगाव)
उपाध्यक्ष :
हनुमंत लुंगे (अमरावती), उदय पवार (धुळे),

गजानन गुपिले (नांदेड), रविदास शिरोडकर (सिंधुदुर्ग)

कोषाध्यक्ष : शिवछत्रपती पुरस्कार विजेते सतीश धोंडगे (नाशिक)
महासचिव : रणधीर सिंग (मुंबई)

सहसचिव :

आनंद चव्हाण (सोलापूर), मिलिंद शिंदे (ठाणे),

पंकज भारसाखळे (छ. संभाजीनगर), अभिजित वनिरे (कोल्हापूर)

कार्यकारिणी सदस्य :

प्रवीण सिंग (गडचिरोली), किरण थोरात (पालघर), गणेश शिरसाठ (यवतमाळ),

दर्शन रोकडे (वाशीम), प्रवीण अंबेकर (रत्नागिरी),

गणेश माळवे (जालना), शीतल नितीन जाधव (वर्धा)

 

……

 

ग्रामीण व गुणवंत खेळाडूंना प्राधान्य

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ना. अतुल सावे यांनी सांगितले की, “राज्यात नियमित राज्य व राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धा, तसेच ग्रामीण व निमशहरी भागातील खेळाडुंसाठी संरचित हँडबॉल लीग स्पर्धा सुरू करण्यात येतील.

यासोबतच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवंत खेळाडूंना प्रशिक्षण, क्रीडा साहित्य व आर्थिक सहाय्य देण्याचा संघटनेचा ठाम संकल्प आहे.
सध्या महाराष्ट्रातील ३० पेक्षा अधिक जिल्ह्यांत हँडबॉल संघटनात्मक रचना कार्यरत असून, आगामी काळात शालेय, महाविद्यालयीन स्तरावर प्रशिक्षक व पंच प्रशिक्षण, तसेच टॅलेंट सर्च उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

…….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here