Home Uncategorized काळाचौकी जिजामाता नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प

काळाचौकी जिजामाता नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प

63
0

काळाचौकी जिजामाता नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प गेल्या ३० वर्षांपासून मे. शांती ओम रेसिडेन्सी प्रा. लि. या विकासकामुळे रखडलेला आहे. त्यांची नियुक्ती रद्द करून हा प्रकल्प शासनाने ताब्यात घेऊन पूर्ण करावा यासाठी युवा संघर्ष संघटनेच्या किरण निकम आणि निलेश गुरव यांसह स्थानिक महिला रहिवाशांनी आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणस्थळी आज महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे (कॅबिनेट मंत्री दर्जा) अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी भेट दिली. यावेळी आ. दरेकर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा विषय मांडून जिजामाता नगरवासियांना न्याय देईन, असा विश्वास देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. आ. प्रवीण दरेकर यांच्या विनंतीला मान देऊन युवा संघर्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी स्थानिक आमदार अजय चौधरी, भाजपा जिल्हा अध्यक्षा शलाका साळवी, नितीन बनकर, गणेश शिंदे यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here