Home Uncategorized मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट(टी-१) वर आज शिवसेना एअरपोर्ट युनियन देणार धडक!

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट(टी-१) वर आज शिवसेना एअरपोर्ट युनियन देणार धडक!

51
0

सवलतीच्या दरात स्वच्छ, दर्जेदार भोजन देणाऱ्या कर्मचारी कँटीन सुविधेपासून कर्मचारी वंचित!

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली *शिवसनेच्या एअरपोर्ट एम्प्लॉईज् एव्हिएशन युनियनच्या वतीने अध्यक्ष आमदार मुरजी पटेल यांच्या नेतृत्वाखाली आणि उपाध्यक्ष सरवार व सरचिटणीस कुणाल सरमळकर यांच्या संयोजनाने, कामगार हिताच्या महत्वांच्या मुद्द्यांवर *मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट च्या व्यवस्थापनाला* कामगारांच्या न्याय व हक्कांच्या मागणी संदर्भात जाब विचारण्यासाठी आज २७ नोव्हेंबर २०२५, दुपारी ३ वाजता, टी-१ या विमानतळावरील कार्यालयावर थेट धडक देण्यात येणार असून, *विमानतळ सीईओ* यांचीही थेट भेट घेतली जाणार आहे.
अशी माहिती शिवसेना( शिंदे ) विभागप्रमुख
एएए युनियन सरचिटणीस कुणाल सरमळकर यांनी दिली आहे.

मुंबई विमानतळ टर्मिनल २ येथील कर्मचारी कँटीन सुविधा तत्काळ सुरू करण्याबाबत तातडीची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली असून
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ येथे कार्यरत कंत्राटी आणि आउटसोर्स कर्मचाऱ्यांचे कर्मचारी कल्याणाशी निगडित अत्यंत गंभीर आणि मानवी अधिकारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नावर आवाज उठवण्यात आला आहे.

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट MIAL हे विमानतळाचे संचालन, पायाभूत सुविधा व कर्मचारी कल्याणासाठी जबाबदार आहे. गेल्या वर्षापर्यंत विमानतळ परिसरात कर्मचाऱ्यांसाठी सवलतीच्या दरात स्वच्छ, दर्जेदार भोजन उपलब्ध करून देणारी कर्मचारी कँटीन सुविधा सुरू होती. मात्र, ही सुविधा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, ज्यामुळे २,५०० ते ३,००० कर्मचारी – २४x७ शिफ्टमध्ये काम करणारे – कँटीन, भोजनगृह किंवा सन्मानपुर्वक बसून जेवण्याची जागा यांपासून वंचित झाले आहेत.

सद्यस्थितीत हाऊसकीपिंग, कार्गो, सुरक्षा, ग्राउंड
हँडलिंग व एअरलाइन सपोर्टमधील कामगारांना बाहेरील महागड्या खानावळींमधून भोजन घ्यावे लागत आहे, जे त्यांच्या वेतनमानानुसार परवडणारे नाही.
अनेक कर्मचाऱ्यांना भोजनाच्या वेळी कॉरिडॉरमध्ये, जमिनीवर किंवा प्रसाधनगृहाजवळ बसावे लागत आहे, कारण निश्चित भोजनगृह उपलब्ध नाही.
ही परिस्थिती अमानवी, अस्वच्छ आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या प्रतिमेला धरून नाही.

फॅक्टरी आणि कामगार हित सुरक्षा या सर्व कायद्यांनुसार प्रमुख नियोक्ता – म्हणजे MIAL – यांच्यावर कँटीन, विश्रांतीगृह, पिण्याचे पाणी, धुण्याची जागा आणि बसण्याची सुविधा उपलब्ध करून देणे कायदेशीर बंधनकारक आहे.
मुंबई विमानतळ २४ तास सुरू असतो आणि हजारो कर्मचारी येथे कार्यरत आहेत, त्यामुळे ही सुविधा कायद्याने बंधनकारक आहे.
मानवी आणि व्यवहार्य दृष्टिकोनातून,एक साधे सत्य विसरता कामा नये-
“आपण काम करतो कारण आपल्याला खाण्याची गरज असते; भुकच नसती तर कोणी कोणासाठी काम केले असते?”
अन्न ही माणसाची सर्वात मूलभूत गरज आहे.
८–१२ तास उच्च-सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिमहाग अन्न खरेदी करणे शक्य नाही.
योग्य कँटीन नाकारणे म्हणजे जीवनावश्यक सुविधा नाकारणे, जे त्यांच्या व्यक्तिमत्त्व, आरोग्य, मनोबल व उत्पादकतेवर गंभीर परिणाम करते. त्यामुळे युनियनची
MIAL ने तातडीने कारवाई ची मागणी असणार आहे की,
टर्मिनल २ मध्ये कर्मचारी कँटीन सुविधा पुनर्स्थापित करावी. सर्व कर्मचारी, विशेषतः कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी, सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करावे. योग्य बसण्याची व्यवस्था असलेले भोजनगृह उपलब्ध करून द्यावे.सर्व कंत्राटदार व एजन्सींना लागू असा एकसमान कँटीन धोरण तयार करावे. अशी मागणी निवेदनात केली आहे.
आता पहायचे आहे की, या शिवसेना एअरपोर्ट युनियनच्या धडकेने हा कामगार हिताचा महत्त्वपुर्ण विषय तातडीने मार्गी लागणार का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here