Home Uncategorized *”बंजारा समाजाला एस टी प्रवर्गाचेआरक्षण मिळत नाही, तोपर्यंत बंजारा बांधवांनी ऊसतोडीला जाऊ...

*”बंजारा समाजाला एस टी प्रवर्गाचेआरक्षण मिळत नाही, तोपर्यंत बंजारा बांधवांनी ऊसतोडीला जाऊ नये* ” *- माजी खासदार हरिभाऊ राठोड*

66
0

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नंतर बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे, ही मागणी जोर धरत आहे मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी लाखाचे मोर्चे बंजारा समाजाच्या वतीने काढण्यात आले, या मोर्च्यात महिला युवक युवती मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत आपण मुळचे आदिवासी असून एस टी आरक्षण मिळण्याकरिता लागणारे सर्व निकष बंजारा समाज पूर्ण करीत आहे. त्यामुळे आम्हाला एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळालेच पाहिजे त्याकरीता आम्ही खेड्या पाड्यात तांडा वस्तीत जाऊन जनजागृती करीत आहोत , पन्नासच्या वर शांततेत मोर्चे काढून देखील शासन आमच्या मागण्याकडे लक्ष देत नसेल तर येणाऱ्या काळात ‘मुंबई चक्का जाम आंदोलन’ केल्याशिवाय पर्याय नाहीं म्हणून मी सर्व खेड्या पाड्या वस्ती तांड्यातील बंजारा बांधवांना आवाहन करतो की, ‘अभी नही, तो कभी नही ‘ आपल्या मुलांच्या भविष्याकरिता जो पर्यंत एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणीही साखर कारखान्यांच्या ऊसतोडीला जाऊ नये.”असे आवाहन माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी समाज बांधवाना केले.
_________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here