दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी उप राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वीरित्या पार पडली.
या मोहिमेमध्ये शून्य ते पाच वयोगटातील एकूण ८,४३,२९४ अपेक्षित लाभार्थ्यांपैकी ५,५१,४४३ बालकांना पोलिओ लसीचे डोस देण्यात आले असून, एकूण ६५.३९% इतके काम पूर्ण झाले आहे.
मागील उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम दि ०८ डिसेंबर २०२४ रोजी पार पडली होती, ज्यामध्ये ६५.६६% इतकी कामगिरी नोंदविण्यात आली होती.
शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांना लसीकरण देण्यासाठी १३ ते १७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान घरोघरी जावून लाभार्थ्याना लस देण्याची IPPI मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत शंभर टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.
===

















