Home मुंबई जी.के.एस.महाविद्यालय खडवली येथे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या टीमने विद्यार्थीनींना ‘गुड टच आणि बॅड...

जी.के.एस.महाविद्यालय खडवली येथे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या टीमने विद्यार्थीनींना ‘गुड टच आणि बॅड टच’ याबद्दल चित्रफित दाखवून केले जनजागृतीपर मार्गदर्शन

117
0

मुंबई
मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थासंचलित जी.के.एस. कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली,येथे ठाणे ग्रामीण पोलीस टिटवाळा व खडवली पोलिस यांच्या पथकाने विद्यार्थ्यांनींना महिलांवर होत असलेल्या अत्याचार, शारीरिक व मानसिक त्रास याबाबत स्वसंरक्षणार्थ सोमवारी प्रशिक्षण दिले.शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सतर्क राहण्यासाठी सूचना दिल्या व मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जी.सागर सर, उपप्राचार्य प्रशांत तांदळे , पोलिस हवालदार औटी , महिला पोलिस निरीक्षक भागश्री , रेश्मा तसेच ढिगे साहेब उपस्थित होते.
प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याकरिता आलेल्या सर्व पोलिसांचा सत्कार प्रा. रसिका लोकरे ,कुंटे सर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी इयत्ता अकरावी आणि बारावीचे विद्यार्थि व विद्यार्थिनी उपस्थित होते . प्रणिता गायकवाड, मयुरी दाभाणे, रितिका मोरे,सुमिता कोठे,कावेरी राऊत,दिव्या दाभाणे, रिया सिंग, मोहिनी राम जाधव,कावेरी प्रभाकर जाधव, गणेश सोनवणे, साक्षी संतोष जाधव,सनी संदीप सातप, विश्वास जाधव ,अभिजीत, सुभाष जाधव,प्रशिक आठवले व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here