Home Uncategorized सावंतवाडी गंजिफा कलांचे ‘फिलाटेली डे’ निमित्त खास चित्र टपालपत्र प्रकाशन

सावंतवाडी गंजिफा कलांचे ‘फिलाटेली डे’ निमित्त खास चित्र टपालपत्र प्रकाशन

85
0

राष्ट्रीय टपाल सप्ताह २०२५ अंतर्गत मुंबईत ‘फिलाटेली डे’ निमित्त कलात्मक टपालपत्रचे प्रकाशन

भारत टपाल विभागाकडून ‘राष्ट्रीय टपाल सप्ताह २०२५’ ६ ऑक्टोबर २०२५ ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान देशभरात आयोजन करण्यात आले. या विशेष निमित्ताने महाराष्ट्र टपाल विभागातर्फे मुंबई टपाल कार्यालय येथे ‘फिलाटेली डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी सावंतवाडीच्या पारंपरिक गंजीफा कलेवर आधारित १० चित्र टपालपत्रचा विशेष संच प्रकाशित करण्यात आला. या सोबतच या कलात्मक टपालपत्रावर विशेष चिन्हाचाही प्रकाशन सोहळा पार पडला.. ‘सावंतवाडी गंजीफा’ कला ही भारतीय पारंपरिक हस्तकलेचे एक महत्त्वपुर्ण उदाहरण मानली जाते.
या टपालपत्र संचासोबत एक माहितीपत्रक ही प्रकाशित करण्यात आले आहे. ‘भारत टपाल विभागा’ ने या उपक्रमाद्वारे ‘भारतीय कलाविषयक वारसा जपण्याचा आणि प्रसार करण्याचा’ उद्देश ठेवला आहे. ‘फिलाटेली डे’च्या निमित्ताने ‘टपाल तिकीट’ व ‘चित्र पोस्टकार्ड संग्रहा’च्या महत्त्वावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी टपाल विभागातील वरिष्ठ अधिकारी, कला रसिक आणि फिलाटेलिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय टपाल सेवेचा वारसा आणि भारतीय कलांचा संगम दर्शवणारा, या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here