Home Uncategorized कर्जमाफीसाठी पंचांगात मुहूर्त बघणार आहात का?

कर्जमाफीसाठी पंचांगात मुहूर्त बघणार आहात का?

57
0

दिवाळीच्या आत कर्जमाफी न झाल्यास शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून दिवाळीनंतर रस्त्यावर उतरणार…उध्दव ठाकरे

“राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही केलीली कर्जमुक्ती राज्यातील शेतकरी आजही विसरले नाहीत. त्यामुळे येत्या काळात सरसकट कर्जमुक्ती करण्याची गरज आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत कर्जमाफी न झाल्यास शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून दिवाळीनंतर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही केलीली कर्जमुक्ती राज्यातील शेतकरी आजही विसरले नाहीत. त्यामुळे येत्या काळात सरसकट कर्जमुक्ती करण्याची गरज आहे. त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी हे सांगत असताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अडचण सोडवत पीएम केअर फ़ंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा मार्ग सुचवला असून अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
लातूर व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना देण्यात येत असलेल्या निधीबाबत मोठं वक्तव्य केले आहे. येत्या काळात त्याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्याशिवाय राज्य सरकार पीक विम्याचा घोटाळा वेगळाच असल्याचे सांगत येत्या काळात शेतकऱ्यांची मागणी लावून धरणार असल्याचे स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना बँकांची नोटीस आली आहे. त्यांनी ती आमच्या शाखेत आणून द्यावे. बाकी काही करायचे ते मी पाहतो. कर्जमाफीसाठी पंचांग बघून मुहूर्त बघणार आहात का? असे सांगत वेळप्रसंगी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे इशारा त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here