Home Uncategorized *भारत–जपान भागीदारीस नवे बळ*

*भारत–जपान भागीदारीस नवे बळ*

96
0

*मिई प्रीफेक्चर गव्हर्नर कात्सुयुकी इचिमी यांची भारत पॅव्हेलियनला भेट*

ओसाका (जपान), ओसाका वर्ल्ड एक्स्पो – २०२५ येथे जपानच्या मिई प्रीफेक्चरचे गव्हर्नर कात्सुयुकी इचिमी यांनी भारत पॅव्हेलियनला भेट दिली. यावेळी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री यांनी त्यांच्या स्वागतासाठी विशेष उपस्थिती दर्शवून भारत-जपान भागीदारीबाबत सविस्तर संवाद साधला.

महाराष्ट्र हा भारताचा आर्थिक पॉवरहाऊस असून देशाच्या एकूण जीडीपीमध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य आहे, याची माहिती उद्योगमंत्र्यांनी गव्हर्नर इचिमी यांना दिली. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक ही शहरे जागतिक गुंतवणूक, तंत्रज्ञान व कनेक्टिव्हिटीची प्रमुख केंद्रे असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या महाराष्ट्रात ३०० हून अधिक जपानी कंपन्या कार्यरत असून पुणे हे इंडो-जपानी औद्योगिक कॉरिडॉरचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. सुपा-पारनेर येथे जपानी उद्योगांसाठी समर्पित इंडस्ट्रियल पार्कही उभारण्यात आले आहे, याची माहिती यावेळी देण्यात आली.

“भारत–जपानचे नाते हे केवळ अर्थव्यवस्थेपुरते मर्यादित नसून, संस्कृती, परंपरा, विश्वास आणि मैत्रीचे बंध अधिक दृढ करणारे आहे. दोन राष्ट्रे आणि एकच दृष्टी या सेतूबंधातून भारत-जपान भागीदारी आणखी मजबूत होईल,” असा विश्वास उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केला.
000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here