Home Uncategorized *“डॉ. हेमा साने यांच्या पर्यावरणनिष्ठ कार्याला डॉ. नीलम गो-हे यांची श्रद्धांजली”*

*“डॉ. हेमा साने यांच्या पर्यावरणनिष्ठ कार्याला डॉ. नीलम गो-हे यांची श्रद्धांजली”*

75
0

पुणे

ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने (वय ८५) यांच्या निधनाबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी गहिवरलेल्या शब्दांत शोक व्यक्त केला आहे.
डॉ. गो-हे म्हणाल्या की, “डॉ. हेमा साने यांनी साधेपणाने पण निसर्गाशी नाते जोडून आयुष्य व्यतीत केले. पर्यावरण, वनस्पतीशास्त्र आणि प्राच्यविद्या या क्षेत्रांतील त्यांचे मौलिक लेखन, संशोधन व अध्यापन विद्यार्थ्यांना व समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून साधेपणा, निसर्गनिष्ठ जीवन आणि अभ्यासाची अखंड तळमळ यांचे सुंदर उदाहरण दिसते. त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी ठरेल.”

डॉ. गो-हे यांनी या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना आणि सर्व निसर्गप्रेमींना मनःपुर्वक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here