Home नाशिक *राज्यात सामाजिक एेक्य धाेक्यात* *शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकार उदासीन*

*राज्यात सामाजिक एेक्य धाेक्यात* *शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकार उदासीन*

74
0

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार

*पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना खेळणं दुर्दैवी – खा. सुप्रिया सुळे*

*एकजुटीने परिवर्तनासाठी काम करून, जनतेचा विश्वास सार्थ करूया – प्रदेशाध्यक्ष आ शशिकांत शिंदे*

*गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत हा लोकशाहीला फार मोठा धक्का- आ. जयंत पाटील*

*देशाला संवेदना हरवलेले पंतप्रधान लाभले याचं मला दुःख -मुख्य प्रवक्ते आ. जितेंद्र आव्हाड*

नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नाशिक येथे ‘झेप विश्वासाची, स्वाभिमानी महाराष्ट्राची’ या भव्य एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले. यावेळी अनेक विषयाचे तज्ञ आणि ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केले.

“आज केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही आणि कांदा निर्यातीवर बंधने आहेत. नाशिक जिल्हा बँक आजारी असून, शेतकऱ्यांची ही बँक प्रचंड थकबाकीत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. राज्यातील शेतकरी संघर्ष करीत आहेत. केंद्र सरकारकडून निर्यातीवर बंधने घातली जात आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार उदासीन आहे. ” असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले . पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात समाराेपाप्रसंगी ते बाेलत हाेते.

पक्षाध्यक्ष खा.शरद पवार म्हणाले की, “आज केंद्रात ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाहीत. त्यामुळे शेतकरी संघटना अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले. त्यांनी नाशिकच्या शेतकऱ्यांचे कौतुक केले, कारण हा जिल्हा आधुनिक शेती आणि नवनवीन प्रयोगांसाठी ओळखला जातो. शरद जोशींच्या नेतृत्वाखाली झालेल्या शेतकरी आंदोलनाची सुरुवात नाशिकमधूनच झाल्याची आठवणही, खा. शरद पवार यांनी करून दिली.

शरद पवार म्हणाले की, “नाशिक शहर गांधी, नेहरू यांच्या विचारावर चालणारे आहे. येथील शेतकरी प्रयाेगशील असून द्राक्ष, डाळिंब ही प्रमुख पिके आहेत. कांद्याची सर्वाधिक निर्यातही याच जिल्ह्यातून हाेते. पण, आजघडीला केवळ नाशिकच नाही तर संपूर्ण राज्यातील शेतकरी संघर्ष करीत आहेत. केंद्र सरकारकडून निर्यातीवर बंधने घातली जात आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार उदासीन आहे. तीन महिन्यात ११८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे.”असे खा.शरद पवार स म्हणाले.

पुढे खा.शरद पवार म्हणाले की, “देशाचा नकाशा पाहिला तर पाकिस्तान, नेपाळ अडचणीत आहेत. ज्या बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारताने मदत केली, तोही आज आपल्यासोबत नाही. श्रीलंकाही आपल्या बाजूने नाही. ट्रम्प यांची नीती प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावण्याची आहे. मोदींनी आता परराष्ट्र धोरणाबाबत अधिक विचार करण्याची गरज आहे.” असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.

शरद पवार म्हणाले की, “महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवायला लागली आहे, ही अतिशय चिंतेची बाब आहे. समाजात विभागणी हाेऊन कटुता वाढेल, असा निर्णय राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटसंदर्भात घेतला. बावनकुळे समितीत केवळ ओबीसी साेडून दुसरे काेणी नाही. सगळ्या जातीचे लाेक घ्यायला पाहिजेत. सरकारच्या राज्यात सामाजिक वीण विस्कटली असून ही धाेक्याची घंटा आहे. सामाजिक एेक्याबाबत कधीही तडजाेड नाही.”असे खा. शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, “आपला पक्ष गांधी-नेहरू विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. नाशिककरांनी हा विचार स्वीकारला आहे. स्वातंत्र्यापुर्वी नाशिकमध्ये महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू उपस्थित असलेल्या वर्किंग कमिटीच्या बैठकीचा त्यांनी उल्लेख केला. तसेच, “महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा नेता देण्याचे श्रेयही त्यांनी नाशिकला दिले. जवाहरलाल नेहरु यांनी भारताला सावरायचे असेल तर, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बोलवायला हवे म्हणून यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलवून घेतले होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेताच, रात्री लगेच चिनने सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांना नाशिक जिल्ह्यातून खासदार म्हणून बिनविरोध पाठवले होते.” अशी आठवण खा. शरद पवार यांनी सांगितली.

*पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना खेळणं दुर्दैवी – खा. सुप्रियाताई सुळे*

यावेळी कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “पहेलगाम हल्ल्यात २६ पर्यटकांवर हल्ला करून त्यांना दहशतवाद्यांनी ठार मारले. मृतांचे नातेवाईक न्याय मागत आहेत. सरकार मात्र भारत-पाकिस्तान सामन्याला हाेकार देत आहे, हे माेठे दुदैव आहे. पक्षाच्या नेत्यामागे उभे राहा, पक्ष तुमच्यामागे उभा राहिल. काेणाचा नवरा , काेणाची बायकाे काय करते, याच्याशी देणेघणे नाही. आपल्याला काेणाच्या घरात शिरायचे नाही. जाे काेणी चुकीच काम करीत असेल, त्याविराेधात आपण रस्त्यावर उतरले पाहिजे.”असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले.

“एकीकडे पाकिस्तानसोबत चर्चेला तयार नाही मात्र क्रिकेट मॅच खेळली जाते हे दुर्दैव आहे. ऑपरेशन सिंदूरला याप्रमाणे आपण सर्वांनी पुर्ण ताकतीने पाठिंबा दिला होता, पहिले देश मग राज्य मग पक्ष आणि नंतर कुटुंब हे आपले धोरण आणि पक्षाचा विचार आहे. आज जे भारत पाकिस्तानची मॅच खेळली जात आहे याचा आपण जाहीर निषेध आज या शिबिरात आपण सर्वांनी केला पाहिजे.” असेही खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या.

*एकजुटीने परिवर्तनासाठी काम करून, जनतेचा विश्वास सार्थ करूया – प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे*
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, “एकजुटीने परिवर्तनासाठी काम करून, जनतेचा विश्वास सार्थ करूया आणि महाराष्ट्रात दाखवूया की आदरणीय पवार साहेबांशिवाय सत्ता शक्य नाही.”
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोमवारी शेतकऱ्यांचा काढण्यात येणारा मोर्चा राज्यातील सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत ठरेल.” असा विश्वास व्यक्त केला. “राज्यातील सरकार उलथवून टाकण्याची क्षमता या मोर्चात असेल, पुढील काळात शेतकरीच नाही तर बेरोजगार, कामगार यांच्या प्रश्नावर ही पक्ष आक्रमक भूमिका घेईल, अन्य मुद्द्यांपेक्षा सर्वच बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा ही पक्षाची भूमिका असेल. पक्षाच्या प्रत्येक युवकाने पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे अनेक तरुण चांगले वक्ते आहेत त्यांनी पक्षाची प्रतिमा अधिक चांगली व्हावी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजे. त्यांनी इतरांनाही मार्गदर्शन करून पक्ष बांधणीला मदत करण्याचे, आवाहन करताना ते पुढे म्हणाले की “या सर्वांनी एकत्रित येऊन काम केले तर पक्ष अधिक मजबूत होईल जे काम करतील त्यांना राष्ट्रीय पातळीवरील संधी दिली जाईल पक्षाचा हा मेळावा म्हणजे सर्वांशी विचार विनिमय करणे आणि भविष्याची दिशा ठरविणे यासाठी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष संपलेला नाही मी राज्यभरात दौरे करत असताना पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते भेटत आहेत, त्यांना पुढील काळात संधी दिली जाईल.” असे आ. शशिकांत शिंदे म्हणाले.

*गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत, हा लोकशाहीला फार मोठा धक्का- आ. जयंत पाटील*

पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील म्हणाले की, “गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे एक पिढीच्या पिढी प्रतिनिधीत्वापासून वंचित राहिली. हे घटनेच्या विरोधात आहे. लोकशाहीला फार मोठा धक्का आहे.” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले शिवाय,” निवडणूक आयोगामागे मोठी शक्ती उभी असल्याची शक्यता आहे, त्यामुळेच ते सर्वोच्च न्यायालयाला देखील जुमानत नसल्याचे दिसते.” असे पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील म्हणाले.

“मुंबई महानगरपालिकेच्या ११ हजार कोटींच्या मुदत ठेवी अडीच वर्षात मोडीत काढल्या. तरी सुद्धा मुंबईची अवस्था अत्यंत दयनीय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर बूथ कमिट्यांवर भर द्या. पक्षाचे बीएलए निवडा. मतांची चाचपणी करा. नव्या चेहऱ्यांना संधी द्या. स्थानिक पातळीवर संवाद सुरू करा.” असे आवाहन करत असतानाच त्यांनी “तरुणांसाठी राजकीय पोर्टल सुरू करा, त्यास खा. शरदचंद्र पवार यांचं नाव द्या.” तसेच “आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये तरुण चेहऱ्यांना संधी द्या,गाव-शहरातील मुद्द्यांवर काम कराच. त्याचबरोबर अनेक लाडक्या बहिणींना पैशांपासून वंचित का ठेवले? पाकिस्तान सोबतची लढाई आपण का थांबवली? ट्रम्पने युद्ध थांबवलं का? त्यांनी कर का वाढवला? असे प्रश्नही विचारा. सोशल मीडिया प्रभावीपणे वापर कराच मात्र प्रत्यक्ष भेटींवर जास्त भर द्या. गटतट विसरून आपण सर्वजण एकदिलाने काम करा.” असे जयंत पाटील म्हणाले.

*देशाला संवेदना हरवलेले पंतप्रधान लाभले याचं मला दुःख -मुख्य प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड*

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उशिरा का होईना मणिपुरमध्ये जात आहेत आणि जाताना सात हजार कोटी रुपयांचं पॅकेज घेऊन जात आहे. मणिपूरमध्ये महिलांवर झालेले लैंगिक अत्याचार, तिथे झालेली जाळपोळ, तिथे मरण यात्रा या सर्वांवर मलम म्हणून ७००० कोटी रुपयांचं पॅकेज घेऊन पंतप्रधान मणिपुरमध्ये जात आहे. पॅकेजच्या या मलमाने मणिपूरमधील नागरिकांना मिळालेल्या यातना पुसल्या जातील स्वच्छ होतील असा त्यांचा विचार आहे असे संवेदना हरवलेले पंतप्रधान आपल्या देशात आहे याचं मला दुःख आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड भाषणात म्हणाले की, “ओबीसी विरुद्ध मराठा हा अतिशय संविधानशील विभागाला हात लावत आहे. कोणाच्या हातात काय? कोणी काय गमावले? काहीच समजत नाही. मात्र दोन्ही समाज अस्वस्थ करण्यात यश आलं आहे. काल भुजबळ साहेबांबाबत बोलले गेलं, त्यांच्या पोटात, गळ्यात लाथ मारा आणि मंत्रिमंडळातून हाकलून द्या… याचा मी निषेध करतो. कोण कुठला आमदार? एका समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याबद्दल असं बोललं गेलं. मंत्रिमंडळातून बाहेर काढा!
मात्र अशा ज्येष्ठ नेत्याचा, ज्येष्ठ मंत्र्याचा अपमान राज्याच्या राजकीय संस्कृतीला शोभणारा नाही. आपलं राजकीय व्यासपीठ वेगळं असेल. पण, आपली संस्कृती, पवार साहेबांची संस्कृती आजही आठवते. गोपीनाथ मुंडे यांनी पवार साहेबांवर टीका केली. त्यावेळी वातावरण तापण्यासारखे झाले. रात्री अडीच, तीन वाजता पोलिसांची बैठक घेऊन गोपीनाथ मुंडेंची सुरक्षा व्यवस्था तीन पट करण्याचा आदेश त्याच रात्री पवार साहेबांनी घेतला होता. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये , ही भूमिका आम्ही व्यासपीठावरून जाहीर करतो.” असे त्यांनी म्हटले.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, “आर एस एस गुजरातमध्ये स्थापन झाले नाही, तर महाराष्ट्रात झाले आहे. गांधीची हत्या करणाऱ्या महाराष्ट्रात जन्माला आला आहे. हैद्राबाद गॅझेटवर एस टी चे अधिकारी नाही. गॅझेट लागू झाल्यानंतर सहा महिन्यांनी लोकांना कळेल की काय मिळालं? भुजबळ ओबीसी समाजाचे नेते आहेत. सरकारमधील नेते जर बोलत नसतील तर, ओबीसींचे काय हाल आहेत. मराठा-ओबीसी वाद पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जमीनदार मराठा आज अल्पभुधारक झाला. आरक्षण कोणा एकासाठी येत नाही. मराठा समाजासाठी आम्ही सोबत राहू. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे, ही आमच्या नेत्यांची भूमिका आहे.” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

 

याप्रसंगी पक्षाच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रीय महिला अध्यक्ष व राज्यसभा खा. फौज़िया खान, पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. जयंतराव पाटील, राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते आ. जितेंद्र आव्हाड, राज्याचे माजी मंत्री राजेश (भैय्या) टोपे, राज्याचे माजी मंत्री व पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रभारी हर्षवर्धन पाटील, खा. निलेश लंके, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि सर्व सेल- विभागांचे प्रभारी आ. रोहित पवार, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आ. सुनील भुसारा, खासदार भास्कर भगरे, आ. बापूसाहेब पठारे यांच्यासह पक्षाचे इतरही लोकप्रतिनिधी, सर्व सेल आणि विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here