Home उद्योग / शिक्षण वार्ता महाराष्ट्रात नवी #उद्योगक्रांती !

महाराष्ट्रात नवी #उद्योगक्रांती !

198
0

महाराष्ट्रात नवी #उद्योगक्रांती !

जिल्हा गुंतवणूक समिट- २०२४ च्या माध्यमातून राज्यात २६५२ कंपन्या/ उद्योगांनी आतापर्यंत ९६ हजार ६८१ कोटी च्या MOU वर स्वाक्षरी केली आहे. यामुळे राज्यात २ लाख ३१ हजार ३३० इतकी नवीन रोजगार निर्मिती होणार आहे.

जिल्हा गुंतवणूक समिट-२०२४ मध्ये सर्वाधिक ९७५ MOU सह नाशिक विभागाने बाजी मारली असून २१ हजार ५३३ कोटींची गुंतवणूक आकर्षित करत सर्वाधिक ६४ हजार ६६४ रोजगार निर्मितीचं लक्ष्यही निर्धारित केलं आहे. गुंतवणूक आकर्षित करण्यामध्ये २१ हजार ८०६ कोटींच्या गुंतवणूकीसह पुणे विभाग अव्वल ठरला आहे. अपेक्षित रोजगार निर्मितीमध्ये नाशिक, पुणे आणि कोकण विभाग पुढे आहेत.

पुणे, पालघर आणि नाशिक हे गुंतवणूकदारांचे पसंतीचे जिल्हे ठरले आहेत. सर्व जिल्ह्यांचा समान विकास झाला पाहिजे यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम हाती घेतला आहे, त्याचे अपेक्षित परिणाम आता दिसू लागले आहेत. आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या वाशिम, हिंगोली, गडचिरोली तसंच कोकणातील जिल्ह्यांकडेही आता गुंतवणूकदार वळू लागला आहे ही सुखावह बाब आहे.

गुंतवणूक वाढावी म्हणून लक्ष्य निर्धारित करून केलेल्या प्रयत्नांमुळे ही वाटचाल केवळ सामंजस्य करारापुरती मर्यादीत राहिली नसून प्रत्यक्ष उद्योग आणि निर्मितीचं ही विक्रमी लक्ष्य आज महाराष्ट्राने गाठलं आहे.
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आणि रोजगार निर्मिती करण्यात आता जिल्हा- जिल्ह्यांमध्ये लागलेली निकोप स्पर्धा ही कौतुकास्पद आहे.
– – ना उदय सामंत
– उद्योग मंत्री ,महाराष्ट्र यांचे ट्विट

#maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here