Home Uncategorized शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शिक्षण विषयक प्रश्नांवर पत्रकारांशी साधला सुसंवाद…!

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शिक्षण विषयक प्रश्नांवर पत्रकारांशी साधला सुसंवाद…!

69
0

आज मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांचा मनमोकळा संवाद साधला. या संवादादरम्यान शिक्षण क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, शाळांमधील भौतिक सुविधा, शिक्षक भरती प्रक्रिया, शाळा व्यवस्थापन समितींचे बळकटीकरण, पोषण योजना, स्मार्ट वर्ग, आदर्श शाळा उपक्रम, तसेच मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी यासारख्या विषयांवर सविस्तर संवाद साधला.
यावेळी शालेय स्तरावर सैनिकी शिक्षणाची अंमलबजावणी, शाळाबाह्य मुलांसाठी विशेष उपक्रम, तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्याची गरज अधोरेखित केली. १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षांमध्ये कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहितीही दिली. तसेच अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
पत्रकारांशी झालेल्या या संवादातून शिक्षण व्यवस्थेतील सकारात्मक बदलांची दिशा स्पष्ट झाली. पुढील वर्षी राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here