Home नाशिक नाशिक मध्ये प्रथमच निस्वार्थ प्राणी सेवा सत्कार समारंभ संपन्न

नाशिक मध्ये प्रथमच निस्वार्थ प्राणी सेवा सत्कार समारंभ संपन्न

226
0

नाशिक मध्ये प्रथमच निस्वार्थ प्राणी सेवा सत्कार समारंभ संपन्न

नाशिक मध्ये सोमेश्वर मंदिरातील अम्फिथिऐटर यथे नि:स्वार्थ प्राणिसेवा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

विविध प्राणी पशू पक्षी यांच्या सेवा कार्यासाठी नाशिकमध्ये प्रथमच हा छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

नि:स्वार्थ भाव मनात ठेवून प्राणिमात्रांची सेवा स्वतःहून अंत:प्रेरणेने करण्याचं व्रत ज्यांनी घेतलाय त्यांचा हा सत्कार होता.
सदर कार्यक्रमास नाशिक मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, स्वाती लाहिरी,  रश्मी हिरे-बेंडाळे, युवराज मोरे, निखिल पवार या सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला यात लहान मुलं महिला व जेष्ठ नागरिक असे 25 सत्कारार्थी उपस्थित होते. सदर प्राणी प्रेमींचा
डॉ संदीप सुनिता श्रीधर भानोसे,
कृतज्ञ दमाहे, प्रविण देशमुख, युग भालेराव, अभिजीत गांगुर्डे (पाटील), आयुष विजय शिंदे, शिवानी भागवत, स्नेहल गोळे,
युवराज बागमार, योगेश प्रल्हाद पवार, अखिलेश वाळुंज, गौरव माळवे, उमाकांत दुसाने, निकिता ब्राम्हणे, ऋषिकेश भालेराव, योगिता आढाव, सुरज जावरे, संजय गायकवाड, पारथो लाहिरी, मनोज निगळ, किशोर गांगुर्डे, वैभव फड,
नंदू पिंगळ, राजेंद्र नेटवटे सत्कार व गौरव पत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजन सायबर सेक्युरिटी कन्सल्टंट सोयरा अभिजीत वैद्य यांनी केले होते. दूरदर्शनचे अनिल वैद्य तसेच वेदास या स्वयंसेवी संस्थेचे सौरभ सोनवणे, देवव्रत संवत्सरे , भाग्येश भारंबे यांनी सहयोग दिला. कार्यक्रमाचे निवेदन शिल्पा फसे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here