प्रो-गोविंदा लीगसाठी ‘रॅपिडो संस्था’ पुरस्कृत करीत असल्या बाबत विरोधी पक्षांनी टीकास्त्र सोडले. हा विषय चर्चेत आला .दरम्यान ना प्रताप सरनाईक यांनी प्रसार माध्यमांंना आवाहन करणारे निवेदन प्रसारितकेले. ना सरनाईक म्हणतात की,
“कोणताही खेळ हा खेळचं असतो, त्यात राजकारण आणणे योग्य नाही. पुर्वेश प्रताप सरनाईक हे गेली ३ वर्ष प्रो- गोविंदा लीग ही महाराष्ट्रीयन संस्कृती ची शान असलेल्या साहसी खेळांची स्पर्धा भरवत आहेत. यंदा २६ मे पासून ही स्पर्धा सुरू झाली त्यावेळी या स्पर्धेसाठी ज्या २०-२५ पुरस्कृत संस्था आहेत, त्यापैकी रॅपिडो ही देखील एक पुरस्कृत संस्था आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
तथापि, आपल्या मुलाच्या एका कार्यक्रमाला पुरस्कृत करणाऱ्या रॅपीडो या संस्थेच्या अनधिकृत ॲप सेवेबद्दल पावसाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी शंका उपस्थित केल्यानंतर तातडीने कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी या संस्थेवर कारवाई केली आहे. ही कारवाई केवळ एका चालकावर केली नसून त्या संस्थेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर केली आहे. त्यामुळे संबंधित संस्था कोणाला पुरस्कृत करते ,याची कोणतीही भीड न बाळगता नि:पक्षपणे त्या संस्थेच्या चुकीच्या वर्तनाबद्दल कारवाई करण्याचा धाडस मंत्री म्हणून ना प्रताप सरनाईक यांनी दाखवला आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठा संस्थेवर अशा प्रकारे कडक कारवाई करणारे पहिले परिवहन मंत्री हे प्रताप सरनाईक आहेत. खरतर या बाबीचे कौतुक करणे अपेक्षित आहे. परंतु विरोधाला विरोध करायचा म्हणून काही व्यक्तींनी वस्तुस्थिती काय आहे, हे न पाहता चुकीच्या पद्धतीने परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. तो अत्यंत घृणास्पद आहे.
२६ मे २०२५ रोजी स्पर्धा सुरू झाल्यापासून रॅपिडो ही संस्था प्रो- गोविंदा लीगसोबत अधिकृतरित्या संलग्न होती. त्यानंतर, दिनांक २ जुलै २०२५ रोजीच मा. परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी संबंधित प्रकरणी आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली होती. एवढंच नाही तर मंत्री सरनाईक यांच्या निर्देशानुसार परिवहन विभागाने दि.१७ व १८ जुलै रोजी रॅपिडो संस्थेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर *कलम बी. एन. एस.एस.१७३ च्या अंतर्गत आंबोली पोलीस स्थानक मुंबई, येथे रितसर FIR नोंदवला आहे.* ( सोबत या बाबतची कागदपत्रे जोडली आहेत.)
त्यामुळे, कृपया #ProGovinda या खेळाला राजकारणाशी जोडू नका. असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
“उलट दहीहंडी हा पारंपरिक खेळ आता “Pro Govinda” मुळे मॅटवर आणि सुरक्षिततेत खेळला जातो, ही आपल्या महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब आहे.”असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.
सोबत: रॅपिडो संस्थेच्या विरोधात दाखल केलेल्या FIR ची प्रत



















