Home महिला अनन्या शेलारने टीआयजीपी ‘मिस टीन इंडिया २०२५’ चौथ्या सीझनचा फर्स्ट रनर-अप किताब...

अनन्या शेलारने टीआयजीपी ‘मिस टीन इंडिया २०२५’ चौथ्या सीझनचा फर्स्ट रनर-अप किताब पटकावला

80
0

मुंबई: द इंटरनेशनल ग्लॅमर प्रोजेक्ट (TIGP) द्वारा आयोजित टीआयजीपी मिस टीन इंडिया २०२५ (सीझन ४) मधे अनन्या प्रज्ञा रणजित शेलार हिने फर्स्ट रनर-अपचा किताब पटकावला आहे.
मुंबईतील आयटीसी फॉर्च्यून एक्सोटिकामध्ये नुकत्याच झालेल्या या ग्रँड फिनालेमध्ये तिला मुकुट प्रदान केला.

अनन्या शेलार यांनी त्यांच्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले, “टीआयजीपी मिस टीन इंडिया २०२५ ची फर्स्ट रनर-अप होण्याचा मला अभिमान आहे. या प्रवासात माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या टीआयजीपी परिवाराचे, विशेषतः डॉ. स्वारूप पुराणिक सर आणि डॉ. अक्षता प्रभू मॅडम यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच, माझ्या कुटुंबियांचे, प्रेक्षकांचे आणि मार्गदर्शकांचेही आभार, ज्यांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. हे यश तुमच्याशिवाय पूर्ण झाले नसते!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here