Home Uncategorized बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र*

बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र*

70
0

*मुबंई महानगर पालिका निवडणुकीची नांदी?*

बेस्ट उपक्रमातील ‘कामगार
पतपेढी’ ची निवडणूक सोमवार दि १८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर झाली आहे..
सोसायटी निवडणुकीत ज्या पॅनल ची सत्ता , त्या चर्चेत आहेत… मराठी च्या मुद्द्यावर एकत्र आलेले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महापालिकाच काय महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतील अशी सर्वसामान्य लोकांची धारणा असल्याची चर्चा आहे.
बेस्ट चे बहुतांश कामगार पुढारी, युनियन चे पदाधिकारी बेस्ट च्या बाहेरही शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून परिचित आहेत… तर कित्येक पदाधिकारी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत.
बेस्ट पतपेढी ची निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची नांदी आहे असं म्हटलं जातय, त्यामुळे बेस्ट मधील ठाकरे बंधुंच्या युतीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुबंई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यामध्ये मागील काही दिवसापासून युती बाबत चर्चा सुरु होती… वरिष्ठांच्या आदेशानुसार दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतल्याप्रमाणे आता बेस्टमधील प्रत्येक लढाई ‘बेस्ट कामगार सेना’ आणि ‘महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना’ एकत्रित लढणार आहेत…
मराठी माणसाचा रोजगार म्हणजे बेस्ट उपक्रम पण, विद्यमान सरकारमधील पुढारी आणि त्यांची धोरण काही उद्योगपतीना बेस्ट आंदण देण्यासाठी असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे बेस्ट मधील मराठी कामगार हद्दपार होतं चालला आहे .
बेस्टमध्ये ठाकरे ब्रँड एकत्र येणं म्हणजे मराठी माणसाची एकजूट ताकदीने उभी राहणार असल्याचे सुहास सामंत यांनी सांगितले.
बेस्ट कर्मचाऱ्यांना उद्दव ठाकरे सरकारच्या काळात ग्रॅज्युएटीसाठी मुंबई महापलिका प्रशासन नियमित मदत करत होते पण जून २०२२ नंतर महायुती सरकार भाजप सतेत आल्यानंतर बेस्ट मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी वाढत चालली आहे.. बेस्टचा स्व मालकीचा बसताफा कमी होत चालला आहे. नवीन नोकर भरती नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे…
बेस्ट पतपेढीमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे.. मागील नऊ वर्षाच्या कालावधीत बेस्ट कामगार सेनेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामगार कल्याणकारी कामामुळं कामगारांचा प्रचाराला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यामुळे अजून ताकद वाढली आहे याचा पतपेढी च्या निवडणुकीत सकारात्मक परिणाम होणार असल्याचा विश्वास बेस्ट कामगार सेनेला वाटतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here