Home Uncategorized *आरोग्य,दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक विभाग*

*आरोग्य,दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक विभाग*

93
0

*”यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान व यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ / संस्था कृतज्ञता सन्मान” अर्ज करण्यास आवाहन*
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने १ ऑक्टोबर या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून “यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान व यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ / संस्था कृतज्ञता सन्मान” सुरू करण्यात आले आहेत. दि . ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत सोबत दिलेल्या दोनही लिंकवरील, अपेक्षित अर्ज डाऊनलोड करून सोबत दिलेल्या पत्त्यावर पाठविण्यात यावे ,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आपल्या कार्यकर्तृत्वातून सेवानिवृत्त झाल्यानंतर, अनुभवाच्या जोरावर समाजाभिमुख कार्य करणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, जे वैयक्तिक पातळीवर समाजोपयोगी कार्य करीत आहेत. तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन ज्येष्ठ नागरिक संघ किंवा संस्था स्थापन करतात व लोकोपयोगी अनेक कार्य यशस्वीपणे पार पाडतात. असे ज्येष्ठ नागरिक आणि संघ किंवा संस्थेचा यथोचित सन्मान व्हावा, हा या कृतज्ञता सन्मानाचा मुख्य उद्देश्य आहे.
●या सन्मानासाठी दोन महिला, दोन पुरुष, एक दिव्यांग व्यक्ती, एक तृतीयपंथी आणि एक संघ किंवा संस्था यांची निवड करण्यात येईल.
●सन्मानाचे स्वरूप सन्मान चिन्ह, मानपत्र, सन्मानाची रक्कम असे राहील.
●पुरस्कार वितरण सोहळा दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे संपन्न होईल.
अर्ज डाउनलोड करण्यासाठी
●ज्येष्ठ नागरिक वैयक्तिक अर्ज लिंक ●
https://chavancentre.org/announcement/yashwantrao-chavan-senior-citizens-appeal-to-apply-for-state-level-gratitude-award
●ज्येष्ठ नागरिक वैयक्तिक PDF● https://chavancentre.org/images/PDF/1_Application%20Form_2025_Final.pdf
●ज्येष्ठ नागरिक संघ किंवा संस्था अर्ज लिंक● https://chavancentre.org/announcement/yashwantrao-chavan-senior-citizens-association-appeals-for-application-for-state-level-gratitude-award
●ज्येष्ठ नागरिक संघ किंवा संस्था PDF● https://chavancentre.org/images/PDF/2_Application%20Form_2025_Final.pdf
या लिंकवर क्लिक करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क – मनिषा खिल्लारे ०२२-२२०४५४६०, २२०२८५९८ विस्तारित २२४ ( सोमवार ते शुक्रवार सकाळी११ ते सायं ६) ईमेल: hdsc@chavancentre.org

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here