Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या वतीने ‘मराठी बालनाट्य दिवस’ जल्लोषात संपन्न!

बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या वतीने ‘मराठी बालनाट्य दिवस’ जल्लोषात संपन्न!

230
0

कल्याण :-
चौकट
रत्नाकर मतकरी लिखित व सुधा करमरकर दिग्दर्शित ‘मधुमंजिरी ’ या बालनाट्याचा पहिला प्रयोग २ ऑगस्ट १९५९ रोजी झाला . तिकीट विक्री करून साहित्य संघात झालेले ते पहिले ‘व्यावसायिक बालनाट्य’ होते. या नाटकाच्या निमित्ताने सुधा करमरकर यांच्या ‘लिटिल थिएटर’ या संस्थेचीही स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे मराठी रंगभूमीवरील पहिले बालनाट्य,या बालनाट्याचा पहिला व्यावसायिक प्रयोग आणि लिटिल थिएटर या संस्थेची स्थापना या त्रिवेणी योगावर शिक्कामोर्तब करत ‘बालरंगभूमी परिषदे’ कडून २ ऑगस्ट हा दिवस ‘मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून जाहीर करण्यात येवून,विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालकलाकारांच्या हक्काचा दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्यात आला.

बातमी
बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या वतीने मराठी ‘बालनाट्य दिवसा’ निमित्त नाट्यछटा, एकपात्री अभिनय,स्कीट अश्या बालकलाविष्कारांच आयोजन करण्यात आलं होतं.अनेक बालकलाकारांनी आपली कला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच बालनाट्य चळवळीतील ज्येष्ठ रंगकर्मी अंबादास जोशी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन मोठ्या सन्मान करण्यात आला.
बालनाट्य स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त केलेल्या बालकलावंतांना तसेच बालनाट्य संस्थांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन करून गौरविण्यात आले. तसेच बालनाट्य चळवळ अविरत जोपासणाऱ्या अनेक मान्यवर कलाकारांचा गुणगौरव देखील करण्यात आला.
कार्यक्रमाला हास्यजत्रा फेम सिने-नाट्य अभिनेते प्रभाकर मोरे यांची उपस्थिती लाभली. ज्येष्ठ रंगकर्मी अंबादास जोशी , शालेय समिती अध्यक्ष राधाकृष्ण पाठक,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मेटकरी, सुभेदार वाडा प्राथमिक शाळेच्या मुख्याधापिका कल्पना पोतदार, लेखक प्रविण कारखानीस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखा अध्यक्ष रवींद्र सावंत,कोषाध्यक्ष हेमंत यादगिरे, बालरंगभूमी परिषद कल्याण शाखा अध्यक्ष सुजाता किरण डांगे, प्रमुख कार्यवाह शिवाजी शिंदे,उपाध्यक्ष संजय गावडे आदि मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी सुभेदार वाडा शाळेचे शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी, पालक , कल्याणमधील बालकलाकार , बालनाट्य संस्थेचे पदाधिकारी तसेच बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेचे सदस्य, ज्येष्ठ नागरीक संघ अध्यक्ष सुनीता मोरांनकार आदी आवर्जून उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या कार्यकारिणी सदस्य मनिषा साबळे यांनी तर संजय गावडे यांनी आभार प्रदर्शन मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here