“मंगळागौर हे एकात्मता, संस्कृती जपणुक व महिला सक्षमीकरणाचे प्रतीक बनले आहे- ना. डॉ. उदय सामंत
शिरगाव, रत्नागिरी येथे ‘उदय सामंत प्रतिष्ठान” आयोजित ‘मंगळागौर स्पर्धा २०२५’ या सांस्कृतिक कार्यक्रमाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी ना. सामंत म्हणाले की,” विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे, महाराष्ट्रातील १ला तालुका म्हणजे रत्नागिरी तालुक्यातील तब्बल १५ हजार महिला या मंगळागौर स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत , ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे.”
ग्रामीण भागातील महिलांचा स्फुर्तिदायक सहभाग पाहता, पहिल्या दोन क्रमांकाच्या गटांच्या अंतिम स्पर्धा रत्नागिरीतील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात घ्याव्यात, अशी विनंती मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी केली.
“यंदाही महिलांसाठी ३ दिवस अष्टविनायक दर्शन यात्रेचा संकल्प करण्यात आला आहे.
श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचा संगम या उपक्रमातून दिसून येतो आहे. मंगळागौर हे केवळ स्पर्धेचे नाही, तर एकात्मतेचे, संस्कृतीच्या जपणुकीचे आणि महिला सक्षमीकरणाचे प्रतीक बनले आहे” असे ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.


















