*कार्यकारी संपादक*
*द ग्लोबल टाइम्स*
२५/७/२०२५
*प्रस्तावना*
*कॅबिनेटमध्ये होणार फेरफार आणि फेरबदल : अनेक मंत्र्यांचे पत्ते कट होणार !अनेक बड्या मंत्र्यांना जोरदार फटका : नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे आणि फडणवीस यांचेही हे धक्कातंत्र आहे का? अशी जोरदार चर्चा अधिवेशनात शेवटी धरू लागली होती.
विरोधक संख्याबळ कमी तरीही, विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार विरोध प्रदर्शन करत होते!
खचाखच गर्दी!
फोटो आणि बाईट चा पाउस! पडळकर -आव्हाड समर्थक फ्रीस्टाइल! त्यानंतर दोघांनी केलेली वक्तव्य!
प्रत्यक्ष बिग बॉस, बिग ब्रदर पाहतोय असा आभास सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण करून गेला. अजूनही हे अधिवेशन गाजतंय!*
*हनी -मनी -बनी..ट्रॅप ?*
राजकारणात कधी कुठे कसे काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही! आजच्या राजकारणाच गणित तर फारच तिकडंम! ना पक्षनिष्ठा,ना विचार बांधिलकी…जिथे ‘योग’ तिथे ‘हम लोग’!
नाना पटोले यांनी सभागृहात पेन ड्राईव्ह दाखवला ! प्रशासनात कार्यरत आजी-माजी सनदी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचा ‘हनिट्रॅप’ करण्यात आल्याची
ही बातमी जोरदार लक्षवेधी ठरली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात
‘कपोलकल्पीत’ असा उल्लेख केला .
मात्र हा विषय जोरदार चर्चेत राहिलाय! नक्की हनी प्रकरण काय? हा प्रश्न आहेच!
याची चर्चा सभागृहात जितेंद्र आव्हाड यांनी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यां वरील हल्लाप्रकरण घडवून संपूर्ण प्रकरण बगल देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची शंका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी अधिवेशन संपल्यानंतर व्यक्त केली.
मात्र हनिट्रॅपमुळेच २०२२ साली राज्यात सत्तांतर झाले असा आरोप कॉंग्रेस नेत्यांकडून करण्यात आला. त्यातही त्यांनी थेट शंका उपस्थित न करता माध्यमांकडून सांगण्यात येत असल्याचा दावा केला!
महत्वाचे म्हणजे यात सर्वपक्षीय नेते संबंधित अधिकारी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
राजकारण कोणत्या वळणावर चालले आहे? हा चिंतेचा विषय आहे! सत्ताकारण हेच याचे उत्तर आहे! नक्की काय प्रकरण आहे ते समोर यायला हवे आणि अशा कोणती महत्त्वाची कागदपत्रे माहिती असामाजिक लोकांकडे गेली आहेत हे समोर यायला हवे! सत्तेसाठी शह-काटशह होत राहतील,पण त्यासाठी थेट महिलांचा उपयोग? पुर्वी शत्रू राष्ट्रांच्या विरोधात विषकन्या असत ,गुप्तहेर असत…आता आपल्या महाराष्ट्रात असे प्रकार कसे व का समोर येताहेत, तेही अधिवेशन काळात! गायगरीब लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिवेशनावर मोठा खर्च होतो! याचा विचार नि उचित आचार समिती करून लोकप्रतिनिधी ना शिस्तीत आणायला हवे. हे तर महा कठीण काम! ‘मांजरांच्या गळ्यात घंटी ‘कोण बांधणार? ईथे महिला उपसभापती विधान भवन पायऱ्यांवरून जात असताना विरोधी पक्षाचे आंदोलक ५० खोके मर्सिडीज ..असे ओरडत होते.. पदाचा,वयाचा सन्मान परीसरात तरी राखला पाहिजे याचे भान सुटले आहे. खूप बिनसलंय ! पण हनि..बनी चा नक्की कोणता धक्का हे समोर येईल की गणित बासनात जाईल? याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे!
*मुख्यमंत्री धक्कातंत्राचा वापर करणार..?*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरफार आणि फेरबदल होण्याची शक्यता त्यांच्या निकटवर्तीयांनी वर्तवली होती व आहे. यामध्ये अनेक मंत्र्यांचे पत्ते कट होणार असून एकीकडे बड्या मंत्र्यांना फटका बसणार असताना नव्या चेहऱ्यांना देखील संधी मिळणार आहे.
अधिवेशनानंतर फेरबदल होणार होते.
फडणवीस हे काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता असून अनेक मंत्र्यांना खुर्ची सोडावी लागणार आहे. ते आपल्या मंत्रिमंडळात लवकरच फेरफार तसेच फेरबदलही करणार असल्याचे समजते.
*धक्कातंत्र भाजपासाठी की इतरांसाठीही?*
फडणवीस यांचे हे धक्कातंत्र फक्त त्यांच्याच म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांपुरते मर्यादित असेल की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठीही असेल याचीही चर्चा रंगली आहे. राजकीय विश्लेषक देखील त्याचा अंदाज वर्तवत आहेत.
*महाराष्ट्राच्या राजकारणाकडे दिल्ली चे ही लक्ष!*
फडणवीस यांचा निर्णय भल्याभल्यांना अचंबित करणारा नसला तरी महाराष्ट्राच्या राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्याच बरोबर उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरु झाली…
दिल्लीत वेगवान घडामोडी सुरू!
अमित शहा हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीला.
नरेंद्र मोदी नुकतेच राष्ट्रपतींची भेट घेऊन आलेत.
शरद पवार यांचे नाव उपराष्ट्रपती म्हणून जवळपास नक्की. त्याबदल्यात शरद पवार गटाचे ९ खासदार भाजपला केंद्रात पाठिंबा देणार
अशी एक आवई उठली, तर दुसरीकडे संघ कामाला लागलाय,नागपुरात खूप काही घडतय !
फडणवीस दिल्लीत जाणार की महाराष्ट्रात? अशा चर्चा जोर धरताहेत !
पण तोवर..गिरीश महाजनांना डच्चू, नार्वेकराना मिळणार संधी! मुनगंटीवार होणार विधानसभा अध्यक्ष!तर बेलगाम वक्तव्य करणारे कृषी मंत्री कोकाटेना उपमुख्यमंत्री अजितदादांनी भेटीस बोलावले आहे. कोकाटे पायउतार होणार अशी दाट शक्यता आहे!
फेरफार किंवा फेरबदल तर होणार आहेत पण ते करताना फडणवीस हे कोणता निकष लावतात हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांची आधीच सर्व ठिकाणी करडी नजर आहे. फक्त आपल्याकडे असलेले माहिती जनसंपर्क खाते सोडून! त्यासाठी ते दूरदृष्टीने काम करतात!
*भाजपाच्या डावपेचांचा तो एक भाग..?*
राजकारणामध्ये एखादी अनपेक्षित खेळी अशी खेळायची की त्यामुळे संपूर्ण भारत अचंबित झाला पाहिजे हे भारतीय जनता पक्षाच्या डावपेचांचा एक भाग आहे. पूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि हरियाणा येथील मुख्यमंत्री होताना अशीच खेळी भाजपाने करून संपूर्ण देशाला अवाक् करून टाकले होते.
*शिंदे, पवारांनाही या धक्क्याचा फटका..?*
हे धक्का तंत्र फक्त भाजपच्या मंत्र्यांपुरतं मर्यादित असेलच असे नाही तर त्याचा फटका शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही बसेल याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
*घडामोडींवर दिल्लीश्वरांचे लक्ष..*
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अगदी बारकाईने लक्ष आहे. एकनाथ शिंदे यांना त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीला बोलावून घेतले गेले होते, याचा उलगडा आता होत आहे. या घडामोडी आता अंतिम टप्प्यात आल्या असून त्या अनुषंगाने कॅबिनेटमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
*इतर पक्षांवरही लक्ष आणि निर्णय?*
आणखी एका वृत्तानुसार काही इतर पक्षातील दिग्गजांना पक्षात घेऊन मग त्यांना मंत्रिमंडळात घेऊन मंत्रिपद दिले जाईल, असे बोलले जात आहे. शिवाय,अनेक विद्यमान मंत्री घरी बसतील, खांदेपालट होईल, नव्या मंडळींना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच यामुळे अनेक मंत्र्यांना प्रचंड मानसिक धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.
*’महायुती’ मध्ये प्रचंड तणाव..?*
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ‘महायुती’ मधील घटक पक्षांमध्ये प्रचंड तणाव असल्याचेही बोलले जात आहे. यापूर्वी, केवळ भाजपाच्याच मंत्र्यांना याचा फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण आता अन्य दोघांनाही त्याची झळ बसणार आहे. यामुळे ‘महायुती’ तील तिन्ही घटक पक्षांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चांगले काम करणाऱ्यांना संधी..
*नवीन चेहऱ्यांना संधी देणार का?* असा एक प्रश्न उपस्थित केला गेला आहे. फेरबदलात अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेत चांगले काम केलेल्या किंवा आपापल्या भागांमध्ये मजबूत पकड असलेल्या नेत्यांना मंत्रिपदे दिली जाऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. त्यासोबतच, काही इतर पक्षातील दिग्गजांना पक्षात घेऊन मग त्यांना मंत्रिमंडळात घेऊन मंत्रिपद दिले जाईल, असेही बोलले जात आहे. यामुळे विरोधकांमध्येही अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांमधील कोण कोण असतील याची खमंग चर्चा मात्र सुरू आहे.
एकूण हनी -मनी -बनी भोवती आगे -मागे ही चक्र फिरत आहेत…
*यात जनतेसाठी घोषणा, निर्देश दिले जात आहेत,मात्र श्रमिक, शेतकरी यांच्याकडे दुर्लक्ष होते आहे.* *मनोरंजन क्षेत्रातील जुनियर कलाकार उपोषण करतात, परिचारिका आंदोलन करताना…मंत्री भेट घेवून निर्देश देतात ..पण न्याय मिळत नाही…अस का?* *संत महंत देवाचे आशीर्वाद हवे असतील तर माणसातल्या देवाला मदत करा…*राजे हो! त्याशिवाय विजय आणि सामाजिक कामाचा गुलाल उधळला जाईल!* *चांगभलं देवा चांगभलं!*
*मधील चौकट*
*गोगावले, शिरसाट, भुमरे, गायकवाड यांची चर्चा..*
*एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले, संजय शिरसाट, संदिपान भुमरे आणि संजय गायकवाड तसेच माणिकराव कोकाटे, दत्ता भरणे, छगन भुजबळ यांची वागणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना*मुळीच आवडलेली नाही अस समजतसमजते. त्यांच्यावर वचक बसावा म्हणून देखील फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत याची खात्री पटते.*



















