Home मुंबई मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मुंबै बँकेसह मजूर फेडरेशनतर्फे ११.७३ लाखांचा धनादेश*

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मुंबै बँकेसह मजूर फेडरेशनतर्फे ११.७३ लाखांचा धनादेश*

118
0

 

*मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मुंबै बँकेसह मजूर फेडरेशनतर्फे ११.७३ लाखांचा धनादेश*

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आवाहनाला प्रतिसाद!*

मुंबई – महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ. दरेकरांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छांच्या जाहिराती, होर्डिंग्ज, फ्लेक्स, बॅनर्स, पुष्पहार व गुच्छ यावर खर्च न करता, वृत्तपत्र किंवा टिव्हीवर जाहिराती न देता ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावी, सेवा, मदत आणि समाजहिताची भावना जोपासा, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनुसार आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील मुंबई बँक, मजूर फेडरेशन व विभागीय मजूर फेडरेशनने सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ११ लाख ७३ हजार २२२ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सढळ हस्ते सुपूर्त केला. याप्रसंगी भाजपा गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर, बँकेचे संचालक आनंदराव गोळे, मजूर फेडरेशन व विभागीय फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

00000

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here