*शिवसेना पक्षाचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा उमेदवार अनिल देसाई यांचा दादर येथील ख्रिस्ती बांधवांशी
वार्तालाप!*
आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा उमेदवार अनिल देसाई यांच्या माहीम विधानसभा मतदार क्षेत्रातील पोर्तुगीज चर्च दादर येथील ख्रिस्ती बांधवांसाठी प्रत्यक्ष उमेदवाराशी वार्तालाप बॉम्बे कॅथलिक सभा, साल्वेशन चर्च,दादर यूनिट ,पैरिश हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी अनिल देसाई यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित ख्रिश्चन बंधू भगिनीना उद्देशून आपल्या अस्खलित इंग्रजी भाषेतून संबोधित करीत ,आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करीत मी माझ्या मतदारसंघात कोणते विधायक कार्य करिन याचा संदर्भ देताना स्थानिक, देशी व परदेशी राजकीय उलाढालीचा आढावा घेतला.तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना पक्षाच्या शैलीत समर्पक उत्तरे देवून वाहवा मिळविली.यावेळी स्थानिक विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह भा.वि.क.सेना पदाधिकारी शाम चित्रे,महेश लाड उपस्थित होते.



















