Home पुणे *राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना जाहीर*

*राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना जाहीर*

106
0

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चिंचबागेत सुरू आहे.

त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. या उद्देशाने सन २०२३ – २०२४ पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिवर्षी होणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सुरू करण्यात आला.

पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून या वर्षीचा पुरस्कार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी महिलांच्या प्रश्नांसाठी केलेले सामाजिक, राजकीय आणि साहित्य विषयक कार्य यांची दखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा, या उद्देशाने त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला . हा पुरस्कार शुक्रवार दिनांक २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ .३०वा. राजे भूषणसिंह होळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून विजय बापू शिवतारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम विजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या प्रसंगी दिलीप दादा बारभाई , सुदामाप्पा इंगळे , रोहिदास कुंभार , माणिकराव झेंडे पाटील, मंगेश घोणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here