Home Uncategorized शशिकांत शिंदे यांचं प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्तीनंतर प्रथम प्रदेश कार्यालयात आल्यानंतर जंगी स्वागत*

शशिकांत शिंदे यांचं प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्तीनंतर प्रथम प्रदेश कार्यालयात आल्यानंतर जंगी स्वागत*

94
0

*शशिकांत शिंदे यांच्याकडून रोहित पवार यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती*

मुंबई दि.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे यांच्या नियुक्तीनंतर प्रथमच प्रदेश कार्यालयात आगमन झाल्यानंतर त्यांचं फटाके फोडत स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काल झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष पदावर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांनी नियुक्ती केले होते. त्यानंतर आज प्रदेश कार्यालयात आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले.

नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षातील आमदार रोहित पवार यांची प्रदेश सरचिटणीस तसेच सर्व फ्रंटल आणि सेलच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की , आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विचाराच्या पक्षाच्या माध्यमातून जयंत पाटील, महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विचारातून जयंत पाटील यांच्या नेतृत्वात जी पक्ष संघटना मजबुतीने चालली पक्ष संघटनेमधील पूर्वीचे पदाधिकारी त्या सर्वांबरोबर विचार करून त्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भविष्य काळामध्ये पुढील वाटचालीचे नियोजन आम्ही करणार आहोत. नवीन काही लोकांना जबाबदारी देण्यात याव्या चळवळीतून हा पक्ष आक्रमकतेपणे उभा राहावा म्हणून जनरल सेक्रेटरी म्हणून रोहित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नवीन नियुक्त्या झाल्यामुळे यापूर्वीच्या नियुक्त्यांच काय असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला असेल तर तो त्यांनी दूर करावा यापूर्वी असलेल्या कमिट्या सक्षमपणे त्या तशाच राहणार आहे. असे शशिकांत शिंदे यांनी बोलताना सांगितले.

शशिकांत शिंदे म्हणाले की , यापूर्वीची असलेली कमिटी सक्षमपणे तशीच राहणार आहे. या कमिटीमध्ये काही फेरबदल करायचे झाले तर सर्वांच्या समितीने हे करण्यात येईल. नवे आणि जुने यांचा मिश्रण करून एक चांगली संघटना आणि चळवळ उभी करण्याचा आपण प्रयत्न करू. रोहित पवार यांच्याकडे ओबीसी सेल आणि युवक संघटनेची जबाबदारी देण्यात येत आहे. मला खात्री आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने या संघटनेची बांधणी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणाने आम्ही करू अशा प्रकारचे अपेक्षा शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की , माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण ही मोठी जबाबदारी दिली आहे. तुम्ही ज्याप्रमाणे आतापर्यंत फुले, शाहू ,आंबेडकर यांच्या विचाराने काम केलं तसेच आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विचाराने तुम्ही चाललात. तुमच्यावर कितीही अडचणी आल्या तरी न घाबरता तुम्ही विचाराबरोबर आणि साहेबा बरोबर तुम्ही राहिलात. जसा मी आणि महाराष्ट्रातील इतर तमाम कार्यकर्ते हे आदरणीय शरद पवार साहेबांबरोबर एक निष्ठेने राहिले आहे. यापुढे देखील अधिक ताकतीने एकत्रितपणे आपण लढू या असा आपल्याला मी विश्वास देतो असेही रोहित पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here