Home कोकण *श्री. विकासभाई सावंत यांचे निधन*

*श्री. विकासभाई सावंत यांचे निधन*

129
0

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत ( ६२ ) यांचे मंगळवारी सकाळी १० .३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा विक्रांत, नातू , भाऊ , भावजय, पुतणे असा परिवार आहे . विकास सावंत माजगाव येथील आपल्या निवासस्थानी होते . सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले . परंतु , तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. सावंत हे माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत यांचे पुत्र होत. त्यांनी जिल्हा बँक संचालक , राज्य सहकारी बँक संचालक,जिल्हा परिषद सभापती म्हणून काम केले होते . अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here