महाराष्ट्र राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या माजी विभागीय संपर्क अधिकारी वीणा गावडे यांचा नुकताच अमृत महोत्सवी(७५वा) वाढदिवस त्यांची, मुलं, सुना आणि मित्रमैत्रिणींनी मोठ्या आनंदात, हर्षोल्हासाने साजरा केला.
वीणाताई या सेवानिवृत्तीपुर्वी तीन माजी मुख्यमंत्री, अनेक माजी मंत्री, राज्यमंत्री, मुख्य सचिव, अनेक विभागीय सचिव यांच्या संपर्क अधिकारी राहिल्या आहेत.
आदर्श संपर्क अधिकारी वीणा गावडे यांचा ७५वा “अमृत महोत्सवी” वाढदिवस हर्षोल्हासात साजरा!*
महाराष्ट्र राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या माजी विभागीय संपर्क अधिकारी वीणाताई गावडे यांचा नुकताच ७५वा अमृत महोत्सवी वाढदिवस त्यांची, मुलं, सुना आणि मित्रमैत्रिणींनी मोठ्या आनंदात, हर्षोल्हासाने साजरा केला.वीणाताई या सेवानिवृत्तीपुर्वी तीन माजी मुख्यमंत्री, अनेक माजी मंत्री, राज्यमंत्री, मुख्य सचिव, अनेक विभागीय सचिव यांच्या संपर्क अधिकारी राहिल्या आहेत.एक उत्कृष्ट मेहनती अधिकारी म्हणून माहिती जनसंपर्क कार्यालयाकडूनही त्यांना पुरस्कृत करण्यात आले होते. एक तत्पर, विश्वासार्ह आणि पत्रकार क्षेत्रातील सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या आदर्श संपर्क अधिकारी म्हणून त्या पत्रकारांमध्येही लोकप्रिय होत्या.
वीणाताईंच्या या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला त्यांच्या नेरूळ, नवीमुंबई येथील त्यांच्या योगा ग्रुपने तसेच त्यांच्या दोन्ही सुना, मुलांनी अतिशय उत्साहात त्यांचे ७५ दिव्यांनी औक्षण केले तसेच ग्रुपमधल्या महिलांनी अनेक कार्यक्रम सादर केले.
यावेळी त्यांचे सहकारी आणि माजी संचालक देवेन्द्र भुजबळ, नितीन शिंदे, ज्योती लायजावाला आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.*
महाराष्ट्र शासनाच्या लोकराज्य मासिकाच्या हिंदी, इंग्रजी मासिकांच्या काही काळ संपादिका म्हणूनही काम पाहिले. त्यांचे लेख, कथा अनेक वृत्तपत्रांत, मासिकात प्रसिद्ध झालेल्या आहेत.एक उत्कृष्ट मेहनती अधिकारी म्हणून माहिती जनसंपर्क कार्यालयाकडूनही त्यांना पुरस्कृत करण्यात आले होते. एक तत्पर, विश्वासार्ह आणि पत्रकार क्षेत्रातील सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या आदर्श संपर्क अधिकारी म्हणून त्या पत्रकारांमध्येही लोकप्रिय होत्या.
वीणाताईंच्या च्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला त्यांच्या नेरूळ, नवीमुंबई येथील त्यांच्या योगा ग्रुपने तसेच त्यांच्या दोन्ही सुना, मुलांनी अतिशय उत्साहात त्यांचे ७५ दिव्यांनी औक्षण केले तसेच ग्रुपमधल्या महिलांनी अनेक कार्यक्रम सादर केले.
यावेळी त्यांचे सहकारी आणि माजी संचालक देवेन्द्र भुजबळ, प्रबोधन (गोरेगाव)चे अध्यक्ष नीतीन शिंदे, ज्योती लायजावाला आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली.मा.वीणाताईंंना, माईमीडिया परिवाराकडून आभाळ भर शुभेच्छा! -शीतल करदेकर





















