*सोलापूर दि.१२.०७.२०२५*
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी, महाराष्ट्र शासन इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने, जाहीर केलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक अडचणी व समस्या निर्माण होत आहेत., त्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने बांधकाम कामगार विभाग सचिव विवेक कुंभार साहेब यांना विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे.
कामगार सचिव यांना, मुंबई येथील कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात, आपल्या अधिकाराखाली बांधकाम कामगारांना आधार देण्यासाठी, महाराष्ट्र शासन इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळामार्फत, विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही अडचणी देखील निर्माण झालेले आहेत., त्यामुळे बांधकाम कामगारांना सदर योजनेपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे., या समस्या दूर करून बांधकाम कामगारांना न्याय मिळवून द्यावे असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले,
त्याचबरोबर निवेदनात खालील मागण्यांचा ही समावेश करण्यात आला १. बांधकाम कामगारांचे पूर्वीचे (ग्रेसपेड) नोंदणी पुस्तक नूतनीकरण न झालेल्या कामगारांचे नूतनीकरण त्वरित सुरू करणे बाबत.२. बांधकाम कामगार नोंदणीत कामगारांचे व वारसदारांच्या नावात चुकीचे झालेली दुरुस्ती करणे ३. गृहउपयोगी वस्तू भांडी संच ठेकेदारांकडून कमी प्रमाणात व कमी दर्जाचे पुरवित असल्याबाबत. ४. बांधकाम कामगारांना भविष्यात पूर्ण सक्षम करण्याबाबत नवीन योजना जाहीर करणे बाबत. ५. बांधकाम कामगार नोंदणी पारदर्शक होण्यासाठी नेमणूक करणाऱ्या समितीत आमच्या समितीच्या सदस्यांचा समावेश करणे बाबत. अशा एकूण ०५ मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.
विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे देण्यात आलेल्या निवेदनात, सोहेल शेख सेक्रेटरी, गणेश बोडू खजिनदार, वैशाली बनसोडे महिला प्रमुख आदी उपस्थित होते.
**************************
*फोटो मॅटर*
बांधकाम कामगार व कल्याणकारी विभागाचे सचिव, विवेक कुंभार साहेब यांना मुंबई येथील कार्यालयात निवेदन देताना, विष्णू कारमपुरी (महाराज), सोहेल शेख, गणेश बुड्डू, वैशाली बनसोडे आदी दिसत आहेत.



















