Home Uncategorized *सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत*दिलेल्या पत्रांचे काय झाले?*- आ. प्रविण दरेकर यांचा सवाल*

*सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत*दिलेल्या पत्रांचे काय झाले?*- आ. प्रविण दरेकर यांचा सवाल*

79
0

मुंबई – आज विधानपरिषदेच्या सभागृहात सदस्य शशिकांत शिंदे यांनी सिडकोने ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर’ ही योजना जाहीर केल्याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली. या चर्चेत सहभाग घेत आ. दरेकर यांनी म्हटले की, सिडकोच्या ग्राहकांच्या समस्येबाबत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी समर्थन देऊन शेरा मारला होता. मग ते पत्र गेले कुठे? गायब झाले का? सचिव, सिडकोच्या महाव्यवस्थापकांना शेरा मारून दिलेल्या पत्रावर कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र ते झाले नाही. सर्वसामान्य माणसाला परवडणारी घरे म्हटले की उडवाउडवीची उत्तरे द्यायची ही पद्धत बदलण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही दिलेल्या पत्राचे काय झाले? याची माहिती शासनाने द्यावी, असा सवाल दरेकरांनी केला. दरम्यान, दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना मंत्री उदय सामंत यांनी याबाबत चौकशी केली जाईल, असे उत्तर दिले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here