Home मुंबई *”नशा खुबे”ला महाराष्ट्राचा झणझणीत धडा!मराठी माणसाच्या अपमानाचा ‘जोड्याने’ समाचार!*

*”नशा खुबे”ला महाराष्ट्राचा झणझणीत धडा!मराठी माणसाच्या अपमानाचा ‘जोड्याने’ समाचार!*

75
0

भेसळ जनता पार्टीचे खासदार निशिकांत दुबे उर्फ “नशा खुबे” यांनी मराठी माणसाच्या अस्मितेला हात घालत, एक खालची पातळी गाठणारे वक्तव्य केले.
मराठी भाषेचा, संस्कृतीचा आणि जनतेच्या स्वाभिमानाचा घोर अपमान करणाऱ्या या खासदाराला
मराठमोळ्या पद्धतीने चपलेचा ‘सन्मान’ मिळाला! घाटकोपर पश्चिम – वेलकम हॉटेल परिसरात
“जोडे मारो आंदोलन” छेडण्यात आले.
हे आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष
ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

 

निशिकांत दुबे यांचं वक्तव्य केवळ मराठी भाषेवर टीका नाही,तर हा महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट हल्ला होता.भाजपचा जुना खेळ पुन्हा सुरु, बिहारमध्ये निवडणुका, आणि महाराष्ट्रात आग!
वक्तव्य करून मराठी जनतेच्या भावना चिथवणे, हेच त्यांचं राजकारण!

पण यावेळी महाराष्ट्र गप्प बसला नाही.
मराठी युवकांनी हातात जोडे घेतले आणि स्पष्ट उत्तर दिलं:
“अस्मितेवर बोललात, तर उत्तर तोंडावर मिळेल!”

निशिकांत दुबेच्या फोटोला चपलेचा ‘प्रणाम’
कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी भाजपा व त्याच्या खोट्या राष्ट्रप्रेमाचा पर्दाफाश मराठी भाषेच्या अपमानाचा जोडीने जाहीर प्रतिकार

आंदोलनाचे नेतृत्व मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केले.त्यांच्यासोबत
युवकचे जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर,मयूर केणी,तालुका अध्यक्ष प्रशांत कालेकर,विजय येवले, इक्रार चौधरी, इमरान खान,अक्षय खिल्लारी, कार्तिक घोंगे, नवनाथ सकपाळ,अनुरभाई दळवी, सिराजभाई अहमद, इम्रान तडवी
हानीफ पटेल, प्रेम कुमार तायडे, विकास वाघमारे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने.

-ॲड. अमोल मातेले यांनी सांगितले की “ही लढाई फक्त निशिकांत दुबेपुरती नाही, ही लढाई आहे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी!
जो मराठी माणसाला कमी लेखेल, तो जोडा खात बसेल!”

मराठी भाषेचा व अस्मितेचा अपमान सहन केला जाणार नाही. भाजपने महाराष्ट्राला जाणीवपूर्वक दुय्यम वागणूक दिली आहे.केंद्रात सत्ता असली तरी महाराष्ट्राच्या युवकांमध्ये अंगार आहे.निवडणुकीसाठी समाजात तेढ पसरवणे ही यांची घाणेरडी सवय!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here