*नाशिक मनपाच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून शहरात मतदार जनजागृती*
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दि.१६ मार्च २०२४ आचारसंहिता लागले असून स्वीप उपक्रमांतर्गत नाशिक शहरातील विविध भागात आयुक्त तथा प्रशासक डॉ.अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या सूचनेनुसार शहरातील विविध भागात जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असून त्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.





















