Home Uncategorized *पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या खाजगीकरणाचा निर्णय रद्द करा* *आमदार अस्लम...

*पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या खाजगीकरणाचा निर्णय रद्द करा* *आमदार अस्लम शेख यांची विधानसभेत मागणी*

112
0

मुंबई, दि. ०४ महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागातील कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांची खासगी संस्थांकडून सेवा घेतली जाणार असून वाहनांसह मनुष्यबळही या संस्थेकडून घेतले जाणार आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांना बेरोजगारीच्या खाईत ढलणारा निर्णय असून या निर्णयामुळे पालिकेचे अस्तित्वच शिल्लक राहणार नाही, त्यामुळे हा निर्णयच रद्द करावा अशी मागणी आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली.

शेख म्हणाले, या खासगी करणाविरोधात कामगार संघटनाच्या संघर्ष समितीने समितीने संपाचा इशारा देखील दिला आहे. अशा प्रकारे खासगीकरण होणार असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अस्तित्वच राहणार नाही. उद्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर मुंबईत कचऱ्याचे ढिग निर्माण होतील.

घन कचरा विभागाला पुरेशा कचरा गाड्या मिळत नाहीत.साहित्य मिळत नाही. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. हा निर्णय घेऊन या कर्मचाऱ्यांवर अन्याय करु नये, असही शेख शेवटी म्हणाले.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here