*सरकारचा रक्षसी बहुमताचा अहंकार गळून पडला! मराठी अस्मितेचा विजय झाला!*
हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रभर निर्माण झालेल्या जनआक्रोशासमोर अखेर महाभ्रष्ट महायुती सरकारला नमते घ्यावे लागले. विरोधी पक्षांनी घेतलेला ठाम पवित्रा, मराठी भाषाप्रेमी नागरिक संस्थांचा जोरदार विरोध आणि सोशल मीडियावर पेटलेली लाट या सर्वांच्या परिणामी सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही शासन आदेश रद्द केले आहेत.
पण यापुढेही आपणा सर्वांना सजग रहावे लागेल. सत्तेत बसलेले लोक मायावी आहेत. त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदी -हिंदू – हिंदूराष्ट्र हा अजेंडा राबविण्याचा प्रयत्न ते पुन्हा करतील आपण तो पुन्हा हाणून पाडू
जय महाराष्ट्र !

















