Home पत्रकार *दैनिक ग्लोबल टाईम्स ( मुंबई आवृत्ती) कार्यकारी संपादक पदी शीतल हरीष करदेकर*

*दैनिक ग्लोबल टाईम्स ( मुंबई आवृत्ती) कार्यकारी संपादक पदी शीतल हरीष करदेकर*

113
0

* *दैनिक ग्लोबल टाईम्स ( मुंबई आवृत्ती) कार्यकारी संपादक पदी शीतल हरीष करदेकर*
द ग्लोबल टाईम्स हे एक तपाहून अधिक काळ सर्वसामान्य वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दैनिक!मुंबई, ठाणे,पालघर येथून प्रसिद्ध होणारे हे दैनिक रायगड,रत्नागिरी, पुणे नाशिक येथून वितरित केले जाते.
या दैनिकाच्या मुंबई आवृत्ती च्या कार्यकारी संपादक पदी अभ्यासू संशोधक पत्रकार शीतल हरीष करदेकर यांची आज दि.२४जून २०२५ ला नियुक्ती करण्यात आली आहे.
वृत्तमानस,आपला वार्ताहर या दैनिकांतून मनोरंजन, सांस्कृतिक, महिला, सामाजिक, राजकीय अशा विविधांगी क्षेत्रातील दोन तपाहून अधिक पत्रकारिता, मुंबई विद्यापीठातील गरवारे करिअर एज्युकेशन मधे एक तपाहून अधिक पत्रकारिता अध्यापन करणाऱ्या, साहित्यिक चरित्रकार शीतल हरीष करदेकर यांच्या या नवीन जबाबदारी साठी त्यांचे समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here