*राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई ही ऑपरेशन लोटसचा एक भाग*
*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते सलील देशमुख*
मुंबई दि. 23 जून
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सूडबुद्धीने करण्यात आलेली कारवाई ही ऑपरेशन लोटसचा एक भाग होता. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते सलील देशमुख यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
सलील देशमुख बोलताना म्हणाले की, ऐकीव माहितीच्या आधारे ईडीने आमच्या घरावर अनेक धाडी टाकल्या, कारवाई केली. माझ्या लहान मुलीचीसुद्धा चौकशी करायला ते डगमगले नाहीत. हा सर्व दुर्दैवी प्रकार ‘ऑपरेशन लोटस’चा एक भाग होता. अँटेलियाखाली बॉम्ब ठेवणारा व्यक्ती परमबीर सिंहच होता. ‘एनआयए’कडून त्यांना अटक होणार होती. पण भाजपाची मदत घेऊन त्यांनी पळ काढला. असेही सलील देशमुख म्हणाले.
सलील देशमुख म्हणाले की, गुलमोहर येथे मोठी रोकड सापडली. तरीही, त्यावर कारवाई होत नसेल तर ते निर्धास्त झालेत. त्यांना कशाचीही भीती राहिली नाही. असे सलील देशमुख यांनी बोलताना सांगितले.
पुढे सलील देशमुख म्हणाले की, निवडणुकीचा डेटा ४५ दिवसांआधी रद्द करा, या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे लोकशाहीला धोका आहे. निवडणूक आयोग कुणाचातरी गुलाम म्हणून काम करत आहे. मराठी भाषेचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. सरकार मराठी भाषेचं खच्चीकरण करत असेल, तर हे दुर्दैवी आहे. असेही सलील देशमुख यांनी बोलताना म्हटले आहे.
Home मुंबई राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई ही ऑपरेशन लोटसचा एक भाग:-राष्ट्रवादी...






















