*म्हस्केंच्या तिकिटावरुन संजीव नाईक समर्थक नाराज*
*मीरा भाईंदर च्या नाईक समर्थक
भाजप पदाधिका-यांचे राजीनामे*
ठाणे: ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांचे नाव घोषित झाल्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्या भाजपमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे याचा थेट फटका महायुतीच्या प्रचारावर होणार असल्याची शक्यता आहे.
नवी मुंबई भाजपाच्या बैठकीत आज बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत याबाबत आपलीं नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे या बैठकीत खुद्द आमदार गणेश नाईक देखील उपस्थित होते
शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभा मतदार संघ उमेदवार नरेश महस्के उमेदवार मान्य नसल्याची प्रतिक्रिया अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली.संजीव नाईक सक्षम उमेदवार असताना नरेश महस्केंना यांना उमेदवारी का ? असा परखड सवालही अनेक पदाधिकाऱ्यांनी यांनी केला.
तसेच निवडणुकीत सेना उमेदवार नरेश म्हस्के यांचे काम करणार नाही असा आक्रमक पवित्रा भाजप पदाधिकाऱ्यांचा यावेळी घेतला.आमदार गणेश नाईक यांच्या समोर पदाधिकाऱ्यांचा हा आक्रोश सुरु होता. तर दुसरीकडे मीरा भाईंदर भाजपा मध्येही नरेश मस्के यांच्या उमेदवारीचे तीव्र पडसाद उमटले असून अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. त्यात प्रामुख्याने धृवकिशोर पाटील महासचिव – भारतीय जनता पार्टी मीरा भाईदर, शहर जिल्हा,एजाज़ ख़ातिब, उपाध्यक्ष – महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग तसेच विशाल पाटील महासचिव – युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी मीरा भाईदर यांचा समावेश आहे. एकीकडे निवडणूक प्रचारास केवळ १५ दिवस राहिले असतानाच भाजपामधील नाराजी नरेश म्हस्केसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
ठाणे लोकसभा क्षेत्रात भाजपची वाढलेली संघटनात्मक ताकद पाहता ही जागा आपल्याच वाट्याला यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून मागील काही दिवसापासून आक्रमकपणे करण्यात येत होती. तर मीरा भाईंदर भाजप पक्षाने शिवसेना उमेदवारासाठी काम करणार नसल्याचे थेट जाहीर केले होते. त्यामुळे या जागेवरून भाजप- शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याची जोरदार चर्चा होती.






















