Home महिला महिला चळवळीच्या व्यापक मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा”* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची...

महिला चळवळीच्या व्यापक मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा”* *उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी सदिच्छा भेट*

90
0

*“महिला चळवळीच्या व्यापक मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण चर्चा”*

*उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याशी सदिच्छा भेट*

मुंबई, दि. २२ जून २०२५ :
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांची काल मुंबईत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मा. विजया रहाटकर यांच्याशी सदिच्छा भेट झाली.

या सदिच्छा भेटीदरम्यान महिला चळवळीशी निगडित विविध सामाजिक, प्रशासकीय आणि धोरणात्मक मुद्द्यांवर सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली. डॉ. गोऱ्हे यांनी विधानपरिषद उपसभापती या नात्याने महिला विकास विषयक बैठका व कार्यक्रम यांची माहिती दिली. महिलांच्या सबलीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा, सामाजिक संस्था व शासकीय यंत्रणांमधील समन्वय, ग्रामीण व शहरी भागांतील महिलांच्या अडचणी, महिला सुरक्षितता, आरोग्य, रोजगार, शिक्षण आणि नेतृत्व विकास या मुद्द्यांवर चर्चा केंद्रित होती.

डॉ. गोऱ्हे यांनी राज्यस्तरावर तसेच केंद्रस्तरावर महिलांसाठी कार्यरत यंत्रणांमध्ये सहकार्य आणि धोरणात्मक एकवाक्यता वाढवण्याची गरज व्यक्त केली. तर रहाटकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी भाजप कार्यसंघातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत राष्ट्रीय महिला आयोगाच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला.

या सदिच्छा भेटीच्या निमित्ताने महिला विषयक प्रश्नांवर विविध पक्षांतील व विचारप्रवाहांतील नेतृत्व एकत्र येऊन सकारात्मक चर्चा करत असल्याचे सकारात्मक उदाहरण समाजासमोर आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here