*डॉ. सुनिता चव्हाण लिखित ‘इच्छामरण’ कथासंग्रहाला कला साधना पुरस्कार*
मुंबई,
वैशाखी वादळवारा काव्यमहोत्सव आणि पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये डॉ.सुनिता चव्हाण लिखित ‘इच्छामरण’ या कथासंग्रहास प्रथम क्रमांकाचा ज्येष्ठ कलावंत जनाबाई पुणेकर कला साधना पुरस्कार देण्यात आला.
ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड यांच्या वतीने पुणे येथील एस.एम. जोशी सभागृहात नुकत्याच आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस आणि ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजातील वास्तववादी घटनांना अधोरेखित करून प्रेरणादायी मार्गदर्शन करणाऱ्या ‘इच्छामरण’ या कथासंग्रहास आतापर्यंत मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे.
डॉ. सुनिता चव्हाण यांच्या एकूण सहा साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. त्यातील ‘भयातील निर्भयाकडे..संवाद सेतू’ या आरोग्य विषयक कथासंग्रहाच्या एका वर्षात सहा आवृत्त्या प्रकाशित होण्याचा दुर्मिळ विक्रम या पुस्तकाच्या नावावर जमा आहे. प्रत्येकाने वाचावे असा हा कथासंग्रह असून याच वर्षात या पुस्तकाची नववी आवृत्ती प्रकाशित झाली असल्याची माहिती डॉ.चव्हाण यांनी दिली आहे.
00000

















